आयपीएलची सांगता करण्यासाठी बीसीसीआय मागवणार निविदा

BCCI invited bids for the closing ceremony of IPL
BCCI invited bids for the closing ceremony of IPLESAKAL

नवी दिल्ली : बीसीसीआयने (BCCI) यंदाच्या आयपीएल (IPL) हंगामाची धुमधडाक्यात सांगता (Closing Ceremony) करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून बीसीसीआयने आज (शनिवारी) आयपीएलच्या सांगता समारंभासाठी निविदा (Biding) मागवण्याचा निर्णय घेतला. निविदा प्रक्रियेचे नियम आणि अटी, पात्रता निकष, निविदा जमा करण्याची प्रक्रिया अधिकार आणि उत्तरदायीत्व हे सर्व आरएफपी (Request for Proposal) मध्ये नमुद केले आहे. ही निविदा भरण्यासाठी 1 लाख रूपये नॉन रिफंडेबल तत्वावर भरावे लागणार आहे. त्यावर जीएसटी वेगळा लागेल. हे आरएफपी विकत घेण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल आहे.

BCCI invited bids for the closing ceremony of IPL
MI vs LSG : लखनौचा थाट! मुंबई इंडियन्सच्या पदरी पराभवाचा 'षटकार'

बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात 'ज्यांना कोणाला आयपीएलच्या सांगता कार्यक्रमाची निविदा दाखल करण्यात रस आहे त्यांना आरएफपी विकत घ्यावी लागेल. जे कोण पात्रता निकष पूर्ण करेल आणि आरफएपी मधील इतर अटी आणि नियम पूर्ण करेल तो निविदा प्रक्रियेसाठी पात्र ठरेल.' आयपीएलचा 15 वा हंगाम 26 मार्चपासून सुरू झाला आहे. या हंगामाचा अंतिम सामना हा 29 मे रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com