BCCI negotiating with Australia and England for IPL player availability : बीसीसीआयने सोमवारी रात्री आयपीएलच्या उर्वरित वेळापत्रकाची घोषणा केली. त्यानुसार आता १७ मे ते ३ जून या कालावधीत आयपीएलचा उर्वरित मोसम खेळवला जाणार आहे. या लढतींसाठी परदेशी खेळाडूंचा सहभाग असायला हवा यासाठी बीसीसीआयकडून परदेशी क्रिकेट मंडळांवर दबाव वाढवण्यात येत आहे. खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत बीसीसीआयचा इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन मंडळांशी संवाद सुरू आहे.