IPL 2023 : चुकीला माफी नाही! केकेआर जिंकला पण... कर्णधार नितीश राणाला BCCI ने केली मोठी शिक्षा

सामना जिंकला पण KKR च्या एका स्टार खेळाडूला BCCI ने ठोठावला मोठा दंड...
IPL 2023  Nitish Rana Fined
IPL 2023 Nitish Rana Fined

Nitish Rana Fined KKR vs PBKS IPL 2023: कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने पंजाब किंग्ज विरुद्ध शेवटच्या षटकात 5 गडी राखून विजय मिळवला. आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि कर्णधार नितीश राणा यांनी पंजाब किंग्जसाठी चमकदार कामगिरी केली आणि केकेआरला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या विजयासह केकेआरने प्लेऑफच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत, मात्र सामना जिंकल्यानंतरही केकेआरचा कर्णधार नितीश राणाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

IPL 2023  Nitish Rana Fined
MI vs RCB: रोहितची खेळी फसली! अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या Playing 11 मध्ये परतणार

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाला कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याच्या संघाने संथ ओव्हर रेट ठेवल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या किमान ओव्हर रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित आचारसंहितेनुसार हा त्याच्या संघाचा हंगामातील पहिला गुन्हा होता. या कारणास्तव नितीश राणा यांना 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

IPL 2023  Nitish Rana Fined
IPL 2023: सामना हरल्यानंतर शिखर धवन संतापला, पराभवाला या खेळाडूला धरले जबाबदार

आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर त्यांना 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाचे 10 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी केकेआरला त्यांचे उर्वरित सामने जिंकावे लागतील.

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघाला 179 धावांचे लक्ष्य दिले. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने 57 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन आणि शाहरुख खान यांनी 21-21 धावा केल्या. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. केकेआरसाठी सर्व फलंदाजांनी वेगवान फलंदाजी केली. 42 धावा केल्याबद्दल आंद्रे रसेलला 'मॅन ऑफ द' पुरस्कार मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com