BCCI IPL Final : देसी जुगाड! सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड ट्विटरवर झालं ट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI IPL Final

BCCI IPL Final 2023 : देसी जुगाड! सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड ट्विटरवर झालं ट्रोल

BCCI IPL Final : आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत टी 20 लीग म्हणून ओळखली जाते. इथे क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या बोली लागतात अन् हजोरो कोटींचा खेळ होतो. याच जोरावर बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून शेखी मिरवते. मात्र आज आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या फायनलमध्ये साचलेल्या पाण्यापुढे या सर्वात श्रीमंत बोर्डाने हात टेकल्याचे दिसले.

आयपीएलच्या 16 व्या हंगामाची फायलन पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय झाला. मात्र राखीव दिवशी देखील पावसाने आपला खेळ करत सामन्यात व्यत्यय आणला. मात्र यावेळी पाऊस फार मोठा नव्हता त्यामुळे खेळ लगेच सुरू होईल अशी आशा निर्माण झाली. पाऊस देखील थांबला मात्र मैदानावरील प्रॅक्टिस विकेटवर पाणी साचले अन् मैदान ओलं झालं. यामुळे पाऊस थांबूनही अनेक तास सामना सुरू होऊ शकला नाही.

अखेर मैदान कोरडे करण्यासाठी ग्राऊंड्समननी देसी जुगाड करत स्पंजच्या तुकड्यांनी पाणी शोषूण घेण्यास सुरूवात केली. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरील हा प्रकार पाहून नेटकरी जाम भडकले. त्यांनी ट्विटरवर बीसीसीआयला चांगलेच टार्गेट केले.

(Sports Latest News)