
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने मागील पर्वात इंडियन प्रीमिअऱ लीगचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतरही KKR ने श्रेयसला रिलीज केले आणि यंदाच्या पर्वात अनुभवी अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवले गेले. कोलकाता जेतेपद कायम राखण्याच्या प्रवासाला २२ मार्चपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीतून सुरुवात करणार आहे. सराव सामन्यात KKR च्या खेळाडूंनी तुफान फटकेबाजी करून आपले मनसुबेही स्पष्ट केले. पण, स्पर्धेला पाच दिवस शिल्लक असताना त्यांना मोठा धक्का बसला आहे.