Viral Video: RCB च्या चाहतीचं नशीबच खराब! ऑफिसमध्ये 'हे' कारण सांगून गेली मॅच पाहायला अन् बॉसनं केलं मोये मोये

Viral Video: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाची एक चाहती ऑफिसमध्ये खोटं कारण सांगून सामना पाहायला गेलेली असतानाच तिच्या बॉसने पकडले, त्यानंतर काय झालं पाहा.
RCB Fan Viral Video
RCB Fan Viral VideoSakal

RCB Fan Viral Video: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील आता 20पेक्षा अधिक सामने खेळून झाले असून मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्यही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, सामना पाहण्यासाठी अनेकांना त्यांच्या कामातूनही वेळ काढावा लागत आहे.

अशाच एका रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या चाहतीने सामना पाहायला जाण्यासाठी ऑफिसमध्ये 'फॅमिली एमर्जन्सी' असे खोटे कारण सांगितले होते. मात्र, तिला नेमके तिच्या बॉसने पकडले. या घटनेबद्दलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

RCB Fan Viral Video
Yash Thakur: धोनीसारखं व्हायचं होतं, पण बनला फास्ट-बॉलर; कोण आहे गुजरातविरुद्ध 5 विकेट्स घेणारा विदर्भाचा 'यश'?

या व्हिडिओमध्ये दिसते की ही चाहती रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेला सामना पाहायला गेली होती. मात्र, बेंगळुरूचा यष्टीरक्षक अनुज रावतने झेल सोडला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील निराशेच्या भावना कॅमेऱ्यामनने टिपल्या आणि त्याचे व्हिज्युअल्स टीव्हवरही दाखवण्यात आले.

नेमके याचवेळी तिच्या बॉसनेही तिला टीव्हीमध्ये पाहिले. त्यामुळे ती ऑफिसमधून लवकर का गेली, याचे कारण त्याला कळाले आणि त्याने त्याबद्दल तिला दुसऱ्या दिवशी विचारले.

या व्हिडिओमध्ये त्या चाहतीच्या आणि तिच्या बॉस यांच्यात झालेल्या संभाषणाचा स्क्रिनशॉटही दिसत आहे. यात दिसते की तिच्या बॉसने तिला आधी विचारले की 'तू आरसीबीची चाहती आहेस का?' त्यावर तिने हो असे उत्तर दिल्यानंतर त्याने तिला सांगितले की त्याने तिला टीव्हीवर पाहिले.

RCB Fan Viral Video
Mumbai Indians : पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये झालं तरी काय? व्हिडिओ होतोय व्हायरल

विशेष म्हणजे बॉसनेही मजेने म्हटले की तिला काही सेंकदच टीव्हीवर पाहिले, परंतु, त्याने लगेचच तिला ओळखले. त्याचबरोबर त्याने गमतीने तिला असेही म्हटले की ऑफिसमधून लवकर निघण्याचे हेच कारण होते तर.

हा व्हिडिओ नेहा द्विवेदी या इंस्टाग्राम युजरकडून शेअर करण्याच आला आहे. या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक व्ह्युज आले असून 4 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. तसेच अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत

बेंगळुरूची खराब सुरुवात

दरम्यान, बेंगळुरूने आयपीएल 2024 मध्ये 5 सामने खेळले आहेत. यातील एकच सामना जिंकण्यात बेंगळुरूला यश मिळाले आहे, तर 4 सामने संघाने पराभूत झाले आहेत. त्यामुळे सध्या गुणतालिकेत बेंगळुरू संघ गुणतालिकेत 9 व्या क्रमांकावर आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com