Harsha Bhogle and Simon Doull face CAB backlash: क्रिकेट समालोचक हर्षा भोगले आणि सायमन डूल यांना ईडन गार्डन्सवर समालोचनास बंदी घालावी, अशी मागणी बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) केली आहे. यासंदर्भात त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पत्र लिहिले आहे. दोघांनी खेळपट्टीच्या मुद्द्यावरून पिच क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्यावर टीका केली होती. सुजन मुखर्जी हटवादी असल्याचे त्यांनी म्हटले होते.