Can Mumbai Indians still qualify for Playoffs IPL 2024
Can Mumbai Indians still qualify for Playoffs IPL 2024 sakal

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Mumbai Indians Playoff Scenario IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर 24 धावांनी पराभव केला आहे. मुंबईचा हा सलग चौथा आणि या हंगामातील आठवा पराभव आहे.

Mumbai Indians Playoff Scenario IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर 24 धावांनी पराभव केला आहे. मुंबईचा हा सलग चौथा आणि या हंगामातील आठवा पराभव आहे.

या पराभवानंतर सर्वत्र चर्चा आहे की आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी काहीही उरले नाही आणि ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. पण मुंबई अजूनही अधिकृतपणे अंतिम 4 च्या शर्यतीतून बाहेर पडलेली नाही.

Can Mumbai Indians still qualify for Playoffs IPL 2024
Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी सामना महत्त्वाचा होता. या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून 169 धावा केल्या. वानखेडे स्टेडियमवर घरच्या प्रेक्षकांसमोर मुंबई हे लक्ष्य सहज गाठू शकेल, असे वाटत होते. पण, तसे झाले नाही, कारण संपूर्ण संघ 18.5 षटकांत 145 धावांवर सर्वबाद झाला. परिणामी या सामन्यात मुंबईला 24 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

Can Mumbai Indians still qualify for Playoffs IPL 2024
MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

आयपीएल 2024 च्या या हंगामामध्ये मुंबई इंडियन्सने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी फ्रँचायझीने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली होती. पण, मुंबईचा हा निर्णय कुठे तरी चुकला असल्याचे दिसले. कारम या हंगामात संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत आणि 8 सामने गमावले आहेत. संघ केवळ 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहे.

Can Mumbai Indians still qualify for Playoffs IPL 2024
Who Was Hamida Banu : जो मला हरवेल त्याच्याशीच मी लग्न करेन...; कोण आहे हमीदा बानो जिच्यासाठी गुगलने बनवले Doodle

कोलकाता नाईट रायडर्सकडून मुंबई इंडियन्सला मिळालेला पराभव हा संघाचा या हंगामातील आठवा पराभव होता. मात्र, त्यानंतरही मुंबईचा संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. पण, मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी चमत्काराची गरज आहे.

आता जरी मुंबईने आपले उरलेले 3 सामने जिंकले तरी अंतिम 4 मध्ये पोहोचणे त्याच्यासाठी अशक्य आहे. कारण टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी संघाला किमान 14 किंवा 16 गुणांची आवश्यकता असते. आणि मुंबई संघ उर्वरित 3 सामने जिंकूनही तो केवळ 12 गुणांपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com