CSK vs GT : आधी शिवम दुबेचा तांडव... नंतर गोलंदाजीचा कहर! चेन्नईची IPL Points Table मध्ये मोठी झेप

Chennai Super Kings beat Gujarat Titans : गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने मंगळवारी येथे झालेल्या आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत गुजरात टायटन्स संघावर 63 धावांनी पराभव केली.
CSK vs GT : आधी शिवम दुबेचा तांडव... नंतर गोलंदाजीचा कहर! चेन्नईची IPL Points Table मध्ये मोठी झेप

Chennai Super Kings beat Gujarat Titans : शिवम दुबेचा तांडव... कर्णधार ऋतुराज गायकवाड, राचिन रवींद्र यांच्या महत्त्वपूर्ण खेळी... डॅरेच मिचेलची अष्टपैलू चमक.... आणि त्यानंतर दीपक चहर, मुस्तफिजूर रहमान, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना या प्रभावी गोलंदाजीचा कहर....

त्यामुळे गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने मंगळवारी येथे झालेल्या आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत गुजरात टायटन्स संघावर 63 धावांनी पराभव केली. सलग दुसऱ्या विजयासह चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. गुजरातचा हा यंदाच्या मोसमातील पहिलाच पराभव ठरला.

CSK vs GT : आधी शिवम दुबेचा तांडव... नंतर गोलंदाजीचा कहर! चेन्नईची IPL Points Table मध्ये मोठी झेप
IPL 2024 CSK vs GT : फक्त कर्णधार बदला... खेळ नाही... 'प्रिन्स'वर भारी पडला चेन्नईचा ऋतु'राज', CSK चा सलग दुसरा विजय

चेन्नईकडून गुजरातसमोर २०७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. गुजरातच्या फलंदाजांचा या लढतीत निभाव लागला नाही. रिद्धिमान साहा (२१ धावा), शुभमन गिल (८ धावा), साई सुदर्शन (३७ धावा), विजय शंकर (१२ धावा), डेव्हिड मिलर (२१ धावा) यांच्याकडून सपशेल निराशा झाली. दीपक चहर, मुस्तफिजूर रहमान, तुषार देशपांडे व मथीशा पथिराना या वेगवान गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना बांधून ठेवले. चहर, रहमान व देशपांडे यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

CSK vs GT : आधी शिवम दुबेचा तांडव... नंतर गोलंदाजीचा कहर! चेन्नईची IPL Points Table मध्ये मोठी झेप
CSK vs GT MS Dhoni : फ्लाइंग धोनी... माहीचा खतरनाक कॅच पाहिला का? वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अप्रतिम झेल... Video Viral

याआधी गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ऋतुराज गायकवाड व राचिन रवींद्र या सलामी जोडीने अवघ्या ५.१ षटकांत ६२ धावांची आक्रमक भागीदारी रचत आपले इरादे स्पष्ट केले. रवींद्र याने अवघ्या २० चेंडूंमध्ये सहा चौकार व तीन षटकारांसह ४६ धावांची खेळी साकारली. राशीद खानच्या गोलंदाजीवर तो रिद्धिमान साहाकरवी यष्टिचीत झाला. साई किशोरने अजिंक्य रहाणेला १२ धावांवर बाद केले. ऋतुराज संयमी खेळी करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, स्पेन्सर जॉन्सन याने त्याला ४६ धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. या खेळीत त्याने पाच चौकार व एक षटकार मारला.

CSK vs GT : आधी शिवम दुबेचा तांडव... नंतर गोलंदाजीचा कहर! चेन्नईची IPL Points Table मध्ये मोठी झेप
CSK vs GT IPL 2024 : 20 वर्षांचा समीर रिझवीने करिअरच्या पहिल्याच बॉलवर राशिद खानला ठोकला षटकार, अन् जिंकले MS धोनीचे मन

शिवम दुबे व डॅरेल मिचेल या जोडीने चेन्नईच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. दुबेने २३ चेंडूंमध्ये ५१ धावांची खेळी केली. त्याने आपली खेळी दोन चौकार व पाच षटकारांनी सजवली. मिचेल याने नाबाद २४ धावा फटकावल्या. चेन्नईने २० षटकांत सहा बाद २०६ धावांचा पाऊस पाडला. गुजरातकडून राशीद खानने ४९ धावा देत दोन फलंदाज बाद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com