CSK vs RCB IPL 2024 : मुस्तफिजूरचं मॅजिक अन् रचिनचा धडाका; ऋतुराजच्या कॅप्टन्सीचा विजयी श्रीगणेशा!

CSK vs RCB IPL 2024 : मुस्तफिजूरचं मॅजिक अन् रचिनचा धडाका; ऋतुराजच्या कॅप्टन्सीचा विजयी श्रीगणेशा!

Chennai Super Kings Defeat Royal Challenger Bengaluru IPL 2024 : मी माझ्या पद्धतीने कॅप्टन्सी करणार... पहिल्याच टॉसला ऋतुराज मोठं वक्तव्य करून गेला..... मात्र फाफ अन् विराटनं पहिल्या 4 षटकातच 41 धावा चोपून मराठमोळ्या ऋतुराजचे टेन्शन वाढवलं. अखेर नव्या कर्णधाराच्या मदतीला मुस्तफिजूर रहमान आला!

सामन्याचं पाचवं आणि स्वतःच पहिलं षटक घेऊन आलेल्या मुस्तफिजूरनं पहिली शिकार ही फाफ ड्युप्लेसिसची केली. मुस्तफिजूरनं तिसऱ्या चेंडूवर 8 चौकार मारून 35 धावा करणाऱ्या फाफला तंबूत पाठवालं. पाठोपाठ रजत पाटीदारला भोपळाही फोडू दिला नाही. मुस्तफिजूरने पहिल्याच षटकात 2 शिकार केल्या अन् सामना तिथंच फिरला!

CSK vs RCB IPL 2024 : मुस्तफिजूरचं मॅजिक अन् रचिनचा धडाका; ऋतुराजच्या कॅप्टन्सीचा विजयी श्रीगणेशा!
Virat Kohli CSK vs RCB : विराट कोहली 12 हजारी मनसबदार! 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

दीपक चाहरनं मॅक्सवेललाही खातं उघडू दिलं नाही. आरसीबीची भलीभली मंडळी विराटच्या डोळ्यासमोर फज्जाला पाय लावून चालली होती. विराट अन् कॅमरून ग्रीननं सीएसकेचा हा झंजावात थोपवण्याचा प्रयत्न केला खरा मात्र तो तोकडा ठरला! 1

12 व्या षटकात पुन्हा चेंडू मुस्तफिजूरच्या हातात आला अन् त्यानं विराटसह ग्रीनला चालचं केलं. आरसीबीचा रंगच उडाला होता. कारण त्यांची अवस्था बिनबाद 41 वरून 5 बाद 78 अशी झाली होती.

आरसीबीचा खेळ आता खल्लास! सीएसकेचे चाहत्यांनी मैदान डोक्यावर घेतलं होतं. मात्र अनुज रावत आणि दिनेश कार्तिक या जोडीनं हळूहळू करत चेन्नईच्या चाहत्यांचा आवाज बंद केला. अनुजनं कार्तिकला साथीला घेतलं अन् शेवटच्या पाच षटकात 71 धावा ठोकल्या. अनुजनं तुषार देशपांडे टाकत असलेल्या 18 व्या षटकात तर 25 धावा चोपल्या. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी 50 चेंडूत 95 धावांची भागीदारी रचली. यामुळे आरसीबी 20 षटकात 173 धावांपर्यंत पोहचली.

CSK vs RCB IPL 2024 : मुस्तफिजूरचं मॅजिक अन् रचिनचा धडाका; ऋतुराजच्या कॅप्टन्सीचा विजयी श्रीगणेशा!
Fact Check: IPL सामन्यापूर्वी विराट पाहतोय राहुल गांधीची पत्रकार परिषद? वाचा व्हायरल फोटोमागील सत्य

अनुज अन् दिनेश कार्तिकनं चेन्नईच्या हातातला सामना दूर नेला असं पहिल्या इनिंगनंतर चित्र झालं होतं. मात्र चेन्नईच्या पोरांनी पहिल्या पाच षटकातच हे टार्गेट कमी असल्यांच दाखवून दिलं. कर्णधार ऋतुराज अन् रचिन रविंद्रनं पॉवर प्लेमध्ये आरसीबीची धुलाई करत सामन्यावर पुन्हा पकड मिळवली. रचिन तीन सिक्स अन् तीन बाऊड्री मारत 37 धावा करून बाद झाला मात्र तो आपलं काम करून गेला.

त्यानंतर येणाऱ्या चेन्नईच्या प्रत्येक फलंदाजानं 20 25 धावांचं योगदान देत संघाला बघता बघता विजयाच्या जवळ पोहचवलं. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात जडेजा अन् इम्पॅक्ट प्लेअर शिवम दुबेनं चेन्नईच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. कर्णधार म्हणून ऋतुराजनं विजयी श्रीगणेशा केला!

आरसीबीनं हंगमाच्या सुरूवातीलाच मार खाल्ला असला तरी अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर उतरेलेल्या विराटनं मात्र मोठा माईल स्टोन गाठला. तो टी 20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला!

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com