PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Punjab Kings vs Chennai Super Kings IPL 2024 : गतविजेते चेन्नई आणि पंजाब किंग्स यांच्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा सामना होत आहे.
Punjab Kings vs Chennai Super Kings IPL 2024 News Marathi
Punjab Kings vs Chennai Super Kings IPL 2024 News Marathisakal

Punjab Kings vs Chennai Super Kings IPL 2024 : गतविजेते चेन्नई आणि पंजाब किंग्स यांच्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा सामना होत आहे. पंजाबसाठी प्लेऑफचा रस्ता काहीसा कठीण आहे; पण चेन्नईसाठीसुद्धा तो सोपा नाही. गतविजेते आता पाचव्या स्थानावर असले तरी त्यांना आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे.

१ मे रोजी घरच्या मैदानावर झालेल्या चेन्नई संघाला पंजाबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. उद्या याच संघाविरुद्ध आपली विस्कटलेली घडी बसवण्याचे काम कर्णधार ऋतुराज गायकवाडसह महेंद्रसिंग धोनीलाही करावे लागणार आहे; परंतु त्यासाठी गोलंदाजीतील अडचण सोडवावी लागणार आहे.

Punjab Kings vs Chennai Super Kings IPL 2024 News Marathi
IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

चेन्नईने गतविजेत्यांच्या थाटात यंदाही आपला प्रवास सुरू केला होता; परंतु घरच्या मैदानावरील तीनपैकी दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. उद्याचा सामना धरमशाला येथे होणार आहे. सामन्याचे वेगळे ठिकाण आपल्याला फलदायी ठरू शकेल, अशी अपेक्षा चेन्नईचा संघ करत असेल.

चेन्नई संघाच्या काही कमजोर गोष्टी पुढे येत आहेत. मधल्या षटकांत धावांची गती अपेक्षेऐवढी वाढवली जात नाही. पंजाबाविरुद्धच्या गेल्या सामन्यात हरप्रीत ब्रार आणि राहुल चहल या फिरकी गोलंदाजांनी चेन्नईला सात बाद १६२ धावांवर रोखले होते. चेन्नईची एकूणच फलंदाजी ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांच्यावर अवलंबून आहे. इतर फलंदजांचे अपयश त्यांना सतावत आहे. अजिंक्य रहाणेचे अपयश कायम आहे, त्यामुळे चेन्नईला अपेक्षित सलामी मिळत नाही. रवींद्र जडेजा आणि नवोदित समीर रिझवी हेसुद्धा फिरकीसमोर अडखळत आहेत.

Punjab Kings vs Chennai Super Kings IPL 2024 News Marathi
IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

गोलंदाजी चेन्नईची ताकद होती. एकीकडे फलंदाजांचे अपयश आणि दुसरीकडे गोलंदाजांच्या दुखापती तसेच अनुपलब्धता त्यांच्या अडचणी वाढवणाऱ्या आहेत. पंजाबविरुद्धच्या याच सामन्यात गोलंदाजी करताना दीपक चहरला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली, त्यामुळे तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी मुस्तफिजूर मायदेशी परतला आहे. तुषार देशपांडेला फ्लूचा आजार झाला आहे. तर मथीशा पथिरानाही व्हिसाच्या (विश्वकरंडक स्पर्धेकरिता) प्रक्रियेसाठी श्रीलंकेत परतला आहे. या सर्व गोलंदाजांनी चेन्नईने यंदा मिळवलेल्या विजयात मोलाचे योगदान दिलेले आहे.

गेल्या सामन्यात चेन्नईने रिचर्ड ग्लीसनला पदार्पणाची संधी दिली होती; पण त्याला प्रभाव पाडता आला नव्हता. त्यामुळे मुकेश चौधरीला उद्याच्या सामन्यात खेळवले जाऊ शकते.

यंदाच्या स्पर्धेत काही सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत लढावे लागलेल्या पंजाब संघाने अगोदरच्या सामन्यात चेन्नईला पराभूत केलेले असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढलेला आहे. सध्या १० सामन्यांतून त्यांचे आठ गुण झाले असून ते सातव्या स्थानावर आहे. पुढच्या चार सामन्यांत या सातव्या क्रमांकावरून किमान चौथ्या स्थानापर्यंतचा प्रवास प्रत्येक सामना जिंकला तरच शक्य आहे.

मुख्य कर्णधार शिखर धवन खांदा दुखापतीमुळे गेल्या काही सामन्यात खेळलेला नाही तरी पंजाब संघ धक्कादायक निकाल लावत आहे. गुजरात संघाला अहमदाबादमध्ये चेन्नई संघाला चेन्नईमध्ये पराभूत करताना कोलकताविरुद्ध त्यांनी विक्रमी धावांचा पाठलाग केलेला आहे.

पंजाब संघासाठी अश्यक असे काहीही नाही. कोलकताविरुद्ध अफलातून शकती खेळी करणारा जॉनी बेअरस्टॉ, रेली रॉसो फॉर्मात आहेत. प्रभसिमरन सिंगही तेवढीच आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता बाळगून आहे तर शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा अफलातून टोलेबाजी करत आहेत. उद्याच्या सामन्यात अगोदरच कमजोर झालेल्या चेन्नईच्या गोलंदाजीसाठी ही धोक्याची घंटा आहे.

पंजाब संघाला गोलंदाजीत मात्र सुधारणा करावी लागणार आहे. त्यांच्याकडे कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग आणि सॅम करन असे आंतरराष्ट्रीय गोलंदाज आहेत. त्यांच्या साथीला हर्षल पटेल आणि हरप्रीत ब्रार चेन्नई फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com