Chennai Super Kings | IPL 2024
Chennai Super Kings | IPL 2024Sakal

IPL 2024: मुंबईच्या रस्त्यांवरही CSK चीच हवा! खेळाडूंची झलक टिपण्यासाठी चाहत्यांची गर्दी, पाहा Video

MI vs CSK: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईत पोहचलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

Chennai Super Kings News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रविवारी (14 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना वानखेडे स्टेडियमवर होणार असून या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

आयपीएलमधील हे दोन्ही संघ सर्वात यशस्वी संघ असून कट्टर प्रतिस्पर्धीही समजले जातात.

या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ मुंबईत पोहचला असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सला सध्या भारतभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे, यामागचे कारण म्हणजे एमएस धोनी.

Chennai Super Kings | IPL 2024
Rohit Sharma: 'आशा आहे रोहित चेन्नईमध्ये जाईल...', माजी इंग्लंड कर्णधाराचं मोठं वक्तव्य, CSK कॅप्टन्सीबद्दलही केलं भाष्य

सध्या अशी चर्चा आहे की धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम आहे. त्यामुळे त्याला चाहत्यांकडूनही जवळपास सर्वच स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्ये प्रेक्षकांकडून चिअर केले जात आहे. चाहते त्याची एक झलक पाहाण्यासाठीही उत्सुक आहे.

धोनीची ही लोकप्रियता मुंबईतही दिसून आली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाला मुंबईतही मोठा पाठिंबा मिळाला असून सध्या एक व्हिडिओही चर्चेत आहे.

हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला असून यामध्ये संघातील खेळाडू बसमधून वानखेडे स्टेडियमवर जात असताना दिसत आहे. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी दिसत असून चाहते खेळाडूंची एक झलक टिपण्यासाठी उत्सुक दिसत आहेत.

Chennai Super Kings | IPL 2024
IPL 2024, DC vs LSG : आयुष बडोनी अन् अर्शद खानने रचला नवा इतिहास, 10 वर्षांपूर्वीच्या त्या विक्रमाला दिला धक्का

मुंबई विरुद्ध चेन्नई

दरम्यान, मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामने नेहमीच चर्चेचा विषय असतो. यंदा हे दोन्ही संघ दोन नव्या कर्णधारांच्या नेतृत्वात आमने-सामने येत आहेत, त्यामुळेही रविवारी दोन्ही संघात होणाऱ्य सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे. चेन्नईचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे, तर मुंबईचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे.

याशिवाय यंदाच्या हंगामात साखळी फेरीत मुंबई आणि चेन्नई संघात हा एकच सामना होणार आहे. त्याशिवाय जर धोनीचा हा अखेरचा हंगाम असेल, तर तो वानखेडे स्टेडियमवर अखेरचा खेळताना दिसू शकतो.

दरम्यान मुंबई आणि चेन्नई संघात आत्तापर्यंत 36 सामने खेळवण्यात आले असून चेन्नईने 16 विजय मिळवले आहेत, तर मुंबईने 20 विजय मिळवले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com