CSK vs DC : चेन्नईने दिल्लीचा केला 27 धावांनी पराभव, केली 2 गुणांची कमाई

Chennai Super Kings vs Delhi Capitals
Chennai Super Kings vs Delhi Capitals esakal

Chennai Super Kings vs Delhi Capitals : चेन्नई सुपर किंग्जचे 168 धावांचे आव्हान दिल्ली कॅपिटल्सला पेलवले नाही. त्यांना 20 षटकात 8 बाद 140 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईने सामना 27 धावांनी जिंकत आपली गुणसंख्या 15 वर नेली. चेन्नईकडून मथिशा पथिरानाने 3 तर दिपक चाहरने 2 बळी टिपले. दिल्लीकडून रिले रूसोने सर्वाधिक 35 धावा केल्या. जरी चेन्नईने सामना जिंकून 2 गुणांची कमाई केली असली तरी आयपीएलचे पॉईंट टेबल तसूभरही हलले नाही. चेन्नई 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर दिल्ली कॅपिटल्स तळात होती ती तळातच राहिली.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला ठराविक अंतराने धक्के देण्याचा प्रयत्न केला. मात्र महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजा यांनी शेवटच्या तीन षटकात तुफान फटकेबाजी करत चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकात 8 बाद 167 धावांपर्यंत पोहचवले. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 25 धाा केल्या. धोनीने 222.22 च्या स्ट्राईक रेटने 9 चेंडूत 20 धावा चोपल्या. तर जडेजाने 16 चेंडूत 21 धावा करून त्याला चांगली साथ दिली.

अक्षर पटेलची फटकेबाजी 

रूसो बाद झाल्यानंतर आलेल्या अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी करत 12 चेंडूत 21 धावा ठोकल्या. त्याने दिल्लीसाठी थोडा आशावाद निर्माण केला. मात्र स्लॉग ओव्हरमध्ये पथिरानाने आपला जलवा पुन्हा दाखवत अक्षर पटेल आणि ललित यादवची शिकार केली. अखेर चेन्नईने सामना 27 धावांची जिंकून आपली गुणसंख्या 15 वर नेली.

रूसो - मनिष पांडेने डाव सावरला

अवघ्या 25 धावात दिल्लीने 3 फलंदाज गमावल्यानंतर रिले रूसो आणि मनिष पांडेने दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी पथिरानाने फोडली. त्याने मनिष पांडेला 27 धावांवर गारद केले. त्यानंतर रूसो देखील 37 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. त्याची शिकार रविंद्र जडेजाने केली. निम्मा संघ 15 षटकात 89 धावात गारद झाल्यामुळे दिल्लीची सामन्यावरील पकड ढिली झाली.

दिल्लीची सुरूवातच खराब 

चेन्नई सुपर किंग्जने विजयासाठी ठेवलेल्या 168 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजीला पहिल्या चेंडूपासूनच गळती लागली. संघाचा कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दीपक चाहरने पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. यानंतर आक्रमक फलंदाजी करणारा फिल्प सॉल्टने 2 षटकार आणि एक चौकार ठोकला. मात्र दीपकने त्याची ही खेळी 17 धावांवर संपवली. त्यानंतर आलेला मिचेल मार्श देखील 5 धावांची भर घालून माघारी परतला.

धोनी 17 व्या षटकातच फलंदाजीला

यंदाच्या हंगामात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा अखेरची काही षटके किंवा चेंडू खेळण्यासाठीच मैदानावर येत होता. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी आज धोनीला 17 व्या षटकातच फलंदाजीला येण्यास भाग पाडले.

धोनी आणि जडेजाने शेवटच्या तीन षटकात 38 धावांची भागीदारी रचली. अखेर जेडाजा 20 व्या षटकात 16 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. दरम्यान, धोनीनेही स्लॉग ऑव्हरमध्ये 222.22 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपत सीएसकेला 167 धावांपर्यंत पोहचवले. धोनीने 2 षटकार आणि 1 चौकार मारत 9 चेंडूत 20 धावा केल्या.

113-5 : दिल्लीच्या फिरकीपटूंचा जलवा

पॉवर प्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला दोन धक्के दिल्यानंतर चेन्नईचा डाव काही केल्या सावराला नाही. मोईन अली 7 तर अजिंक्य रहाणे 20 चेंडूत 21 धावा करून बाद झाले. दिल्लीच्या फिरकीपुढे चेन्नईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

ललित यादव आणि कुलदीप यादव या दोन यादवांनी रहाणे, मोईन अलीची शिकार केल्यानंतर शिवम दुबे आणि अंबाती रायडू यांनी चेन्नईचे शतक पार करून दिले. मात्र मिचेल मार्शने शिवम दुबेला 25 धावांवर आणि खलील अहमदने 17 चेंडूत 23 धावा करणाऱ्या अंबाती रायडूला बाद करत चेन्नईला सहवा धक्का दिला.

49-2 : चेन्नईच्या पॉवर प्लेमध्ये 49 धावा 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने पॉवर प्लेमध्ये 49 धावा केल्या. या दरम्यान, डेवॉन कॉन्वे 10 धावा करून बाद झाला. त्याला अक्षर पटेलने बाद केले. याचबरोबर पॉवर प्ले संपल्या संपल्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड 18 चेंडूत 24 धावा करून अक्षरचीच शिकार झाला.

चेन्नईने नाणेफेक जिंकली

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com