CSK vs GT : गुजरातचा विजयी रथ सुसाट; 20 गुण मिळवत अव्वल स्थान केले पक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 CSK vs GT Live Score

CSK vs GT : गुजरातचा विजयी रथ सुसाट; 20 गुण मिळवत अव्वल स्थान केले पक्के

गुजरातने चेन्नईचा 7 विकेट्सनी केला पराभव

गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जने 134 धावांचे आव्हान 20 व्या षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. गुजरातकडून सलामीवीर वृद्धीमान साहाने नाबाद 62 धावांची खेळी केली. चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या मथीशा पथिरानाने 2 विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 53 धावांची खेळी केली. तर एन जगदीशाने नाबाद 39 धावांची खेळी केली. इतर फलंदाजांना फारसे यश आले नाही.

वृद्धीमान साहाचे अर्धशतक

100-3 : मथिशाने कर्णधारालाच टिपले

मथिशा पथिरानाने गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला 7 धावांवर बाद केले.

90-2 : मॅथ्यू वेडकडून पुन्हा निराशा

मोईन अलीने मॅथ्यू वेडला 20 धावांवर बाद करत गुजरातला दुसला धक्का दिला.

59-1 : मथिशाने पदार्पणात घेतली विकेट

लसिथ मलिंगा सारखी बॉलिंग अॅक्शन असणाऱ्या मथिशाने शुभमन गिलला 18 धावांवर बाद करत धडाक्यात पदार्पण केले.

133-5 (20 Ov) : गुजरातसमोर 134 धावांचे लक्ष्य

130-5 : ऋतुराजनंतर गळती सुरू

ऋुतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर सीएसकेने पाठोपाठ दोन विकेट गमावल्या. अल्झारी जोसेफने शिवम दुबेला शुन्यावर तर मोहम्मद शमीने धोनीला 7 धावांवर बाद केले.

113-3 : अर्धशतकानंतर गायकवाड झाला बाद

ऋतुराज गायकवाडने 49 चेंडूत 53 धावांची खेळी करत सीएसकेला शंभरी पार करून दिली. मात्र त्याची ही खेळी राशिद खानने संपवली.

मोईन अली बाद 

ऋतुराज गायकवाड बरोबर दुसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचणारा मोईन अली 17 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. त्याला साईकिशोरने बाद केले.

8/1 सीएसकेला पहिला धक्का, डेवोन कॉनवे शमीच्या चेंडूवर 5 धावा करुन बाद

  • गुजरात टायटन्स

    रिद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मॅथ्यू वाड, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अल्झारी जोसेफ, रशीद खान, मोहम्मद शमी, आर साई किशोर, यश दयाल.

  • चेन्नई सुपर किंग्ज

    ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मिचेल सँटनर, मोईन अली, एन जगदीसन, शिवम दुबे, एमएस धोनी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथिशा पाथिराना, मुकेश चौधरी.

IPL 2022 CSK vs GT Live Score: आयपीएलच्या चालू हंगामातील 62 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्स प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे तर चेन्नईचा संघ या शर्यतीतून बाहेर पडला आहे. गुजरातने आतापर्यंत 12 पैकी 9 सामने जिंकले असून 18 गुणांसह संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याच वेळी, चेन्नईने 12 पैकी 8 सामने गमावले आहेत आणि केवळ 4 सामने जिंकले आहेत. संघाचे 8 गुण आहेत.

Web Title: Chennai Super Kings Vs Gujarat Titans 62nd Match Live Cricket Score Highlights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top