Chris Gayle IPL Return In 2023 | अपमान झाला तरी 'मी पुन्हा येईन'; ख्रिस गेलची घोषणा, 'या' संघातर्फे खेळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chris Gayle sets sights on IPL return in 2023

अपमान झाला तरी 'मी पुन्हा येईन'; ख्रिस गेलची घोषणा, 'या' संघातर्फे खेळणार

Chris Gayle sets sights on IPL return in 2023: वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार असल्याचे जाहीर केले आहे. गेलने आयपीएलच्या 15 व्या हंगामात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. गेलने IPL 2022 मधून माघार घेण्याच्या निर्णयामागील कारण उघड केले आहे. गेल म्हणाला की, माझ्याशी चांगली वागणूक केली गेली नाही आणि मला योग्य तो आदर दिला नाही. म्हणूनच मी आयपीएल 2022 मधून माघार घेतली. आयपीएलमध्ये गेल कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज कडून खेळला आहे. खराब फॉर्ममुळे ख्रिस गेल गेल्या हंगामामध्ये पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हत.

द मिरर शीवर बोलताना गेल म्हणाला, गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये माझ्याशी ज्या पद्धतीने वागले जात होते ते योग्य नव्हते. खेळ आणि आयपीएलसाठी इतकं काही करूनही मला तो आदर मिळाला नाही. या वागणुकीमुळे मी स्वतला या आयपीएलच्या लिलावापासून लांब राहिलो. ख्रिस गेल इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील महान खेळाडूंमध्ये गणला जातो. टूर्नामेंटच्या सुरुवातीपासून त्याने तीन वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळला आहे. KKR सोबत आपला प्रवास सुरू करणाऱ्या या शानदार फलंदाजाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि नंतर पंजाब किंग्जसाठीही ताकद दाखवली. गेलने मिररला सांगितले, मी पुढच्या वर्षी परत येत आहे, त्यांना माझी गरज आहे.

गेलने 142 सामन्यात 4965 धावा केल्या आहेत. गेलने 2011 ते 2017 दरम्यान आरसीबीसाठी 85 सामन्यांत 43 च्या सरासरीने 3163 धावा केल्या. 2018 मध्ये पंजाब किंग्जने बिग हिटरवर विश्वास दाखवला आणि त्याला त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले. गेल गेली अनेक वर्षे पंजाबसाठी चमकला पण गेल्या दोन मोसमात तो फक्त 17 सामने खेळू शकला. गेल म्हणाला, आरसीबी आणि पंजाब या दोन संघांपैकी मला एकाबरोबर विजेतेपद मिळवायला आवडेल. आरसीबीसोबत माझा हंगाम खूप चांगला होता, जिथे मी अधिक यशस्वी झालो.

टॅग्स :IPLChris GayleIPL 2022