
भरवश्याच्या म्हशीला...; ७ कोटींच्या शिवम मावीचा IPL मधला लाजिरवाणा रेकॉर्ड!
IPL 2022 : आयपीएलचा 53 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. केकेआरचा वेगवान गोलंदाज शिवम मावीने 19व्या षटकात 5 षटकार मारले. मावीच्या पहिल्या तीन चेंडूंवर मार्कस स्टॉइनिसने षटकारांची हॅट्ट्रिक केली. चौथा चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात मावी लाँग ऑनवर श्रेयस अय्यरकडे झेलबाद झाला. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या जेसन होल्डरने उर्वरित दोन चेंडूवर षटकार मारले. यासह मावीने केकेआरसाठी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकले. यानंतर शिवम मावीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. (Shivam Mavi Twitter Troll Concedes 30 Runs)
कोलकाताने यापूर्वी 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध एका षटकात 29 धावा दिल्या होत्या. त्यावेळी पण गोलंदाज शिवम मावी होता. त्याच वर्षी राजस्थान विरुद्धच्या दुसर्या सामन्यात, कोलकाताने एका षटकात 28 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या वेळी देखील गोलंदाज शिवम मावीशिवाय दुसरा कोणीही नव्हता. मावीने केकेआरसाठी आतापर्यंतची तीन सर्वात महागडी षटके टाकली आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सने सलग पाचव्या वर्षी लिलावात शिवम मावीवर खूप पैसा खर्च केला आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये कोलकाताने 7.25 कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात सामील केले आहे. मावी 2018 पासून KKR चा भाग आहे आणि दरवर्षी KKR त्यांच्यावर 3 कोटी रुपये खर्च करते. एका षटकात 5 षटकार मारणारा शिवम मावी आयपीएलमधील चौथा गोलंदाज ठरला आहे. मावीच्या आधी 2012 मध्ये राहुल शर्मा, 2020 मध्ये शेल्डन कॉट्रेल आणि 2021 मध्ये हर्षल पटेलने एका षटकात 5 षटकार मारले होते.
लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 7 विकेट गमावून 176 धावा केल्या. लखनौ सुपर जायंटचे 177 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला लखनौ सुपर जायंटच्या गोलंदाजांनी 101 धावांवर डाव गुंडळला. लखनौने केकेआरवर 75 धावांनी दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.