IPL 2022 GT vs MI: गुजरातची वाट मुंबई रोखणार?

आयपीएल : पंड्याचा संघ ‘प्ले ऑफ’पासून एक विजय दूर
cricket ipl 2022 Hardik Pandya team Gujarat Titans play off Rohit Sharma Mumbai Indians gt vs mi
cricket ipl 2022 Hardik Pandya team Gujarat Titans play off Rohit Sharma Mumbai Indians gt vs mi sakal

मुंबई : हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्सचा संघ यंदाच्या आयपीएल मोसमात जबरदस्त खेळ करीत आहे. आठ विजयांसह या संघाने प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे, पण त्याआधी त्यांच्यासमोर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स यांच्यामधील लढत उद्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या वेळी प्ले ऑफपासून एक विजय दूर असलेल्या गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सचा संघ रोखणार का, या प्रश्‍नाचे उत्तर लवकरच मिळेल.

हैदराबादने गुजरातचा विजयरथ रोखला. त्यामुळे सलग पाच विजयांनंतर गुजरातला पराभवाला सामोरे जावे लागले. या लढतीत गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो अंगलट आला, अशी टीकाही हार्दिकवर होऊ लागली. या वेळी हार्दिकने या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले, की आम्हाला कम्फर्ट झोन म्हणजेच आरामदायक वातावरणातून बाहेर यायचे होते. पुढील लढतींमध्ये अशा प्रकारची परिस्थिती समोर आल्यास कशा प्रकारे सामोरे जाऊ यासाठी हैदराबादविरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, असेही तो म्हणाला. याचाच अर्थ गुजरातचा संघ पुढील आव्हानाचा आतापासूनच विचार करू लागला आहे.

गुजरातच्या संघाची फलंदाजीची मदार शुभमन गिल, रिद्धिमान साहा या सलामीवीरांसह कर्णधार हार्दिक, डेव्हिड मिलर यांच्या खांद्यावर आहे. राहुल तेवतिया व राशीद खान हे मधल्या फळीत खालच्या स्थानावर सर्वस्व पणाला लावत आहेत. हातातून निसटलेल्या लढतींमध्ये या दोघांनी दमदार फलंदाजी करीत गुजरातला रोमहर्षक विजय मिळवून दिले आहेत.

सूर्या, तिलकवर मदार

कर्णधार रोहित शर्मा व इशान किशन या मुंबईच्या सलामीवीरांना या मोसमात अद्याप तरी सूर गवसलेला नाही, पण तरीही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगली जात आहे; मात्र मुंबईचा संघ फलंदाजी विभागात तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव या दोघांच्या फलंदाजीवरच अवलंबून असणार आहे. टीम डेव्हिड याने मागील लढतीत दडपणाविना खेळ केला.

शमी, फर्ग्युसन, राशीद प्रभावी

गुजरातच्या आतापर्यंतच्या उल्लेखनीय कामगिरीत गोलंदाजांनीही मोलाचा वाटा उचलला आहे. मोहम्मद शमी या अनुभवी गोलंदाजाने १५ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसन यानेही ११ फलंदाज बाद केले आहेत. अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज राशीद खान याने ९ फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. या गोलंदाजांवर त्यांची मदार असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com