Mayank Yadav : मयंक यादवला पुन्हा दुखापत

पुन्हा त्याच ठिकाणी वेदना झाल्याची प्रशिक्षक लँगर यांच्याकडून माहिती.
Mayank Yadav Injury Update
Mayank Yadav Injury Updateesakal

लखनौ - ज्या दुखापतीमुळे युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव तीन आठवडे आयपीएल लढतीपासून दूर झाला, त्याच ठिकाणी पुन्हा त्याला दुखापत झाली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत तो आपली चार षटकेही पूर्ण करू शकला नाही. वेदना होऊ लागल्यामुळे मयंक ड्रेसिंग रूममध्ये परतला.

लखनौ सुपर जायंटस्‌ संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी मयंकच्या दुखापतीबाबत स्पष्ट केले की, मयंकला पुन्हा त्याच ठिकाणी वेदना होऊ लागल्या आहेत. मयंकच्या दुखापतीवर चांगले उपचार करण्यात आले. गेल्या आठवड्यात त्याला वेदनाही झाल्या नाहीत. तो तंदुरुस्त होता. आता उद्या ज्या ठिकाणी दुखापत होत आहे, त्या ठिकाणचे स्कॅन करण्यात येणार आहे. त्यानंतर मयंकच्या दुखापतीबाबतची परिस्थिती समजेल.

दरम्यान, जस्टीन लँगर यांनी लखनौने मुंबईवर मिळवलेल्या विजयाचे कौतुक केले. तसेच मार्कस स्टॉयनिस याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीचीही स्तुती केली. ते म्हणाले, मार्कस स्टॉयनिस याने अर्धशतकी खेळी साकारली. एक फलंदाजही बाद केला. त्याने झेलही टिपला.

आयपीएलमधील प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी स्टॉयनिससारखे अष्टपैलू खेळाडू संघात असायला हवेत. आयपीएल ही विश्‍वकरंडकासारखीच स्पर्धा आहे. अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी कमालीची चुरस दिसून येत आहे.

मनसोक्त गोलंदाजीची मुभा

लखनौचा कर्णधार के. एल. राहुल याने मयंक यादवच्या दुखापतीबाबत म्हटले की, माझे याबाबत त्याच्यासोबत बोलणे झालेले नाही. पहिल्या चेंडूनंतर त्याला वेदना होत आहेत हे त्याच्याकडून सांगण्यात आले. तो युवा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्याबाबत जोखीम पत्करणार नाही.

त्याच्याकडे नुसता वेगच नाही, तर गोलंदाजीतील इतरही गुणवत्ता आहे. तो जास्तीतजास्त खेळेल, तसा तो शिकत जाईल. आम्ही त्याच्यावर कोणताही दबाव टाकत नाही. त्याला गोलंदाजी मनसोक्त करण्याची मुभा देतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com