Ruturaj Gaikwad Marriage: ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आले समोर

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या चांगलाच चर्चेत आला
Ruturaj Gaikwad
Ruturaj GaikwadEsakal

चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची चर्चा होण्याची सध्या दोन कारणे आहेत. एक म्हणजे ऋतुराजची आयपीएल मधील खेळी आणि दूसरा म्हणजे ऋतुराज लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा. यामुळे सध्या ऋतुराज आणि त्याचं लग्न यांच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. त्याची होणारी पत्नी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकतंच ऋतुराजच्या पत्नीचं नाव देखील समोर आलं आहे.

आयपीएलच्या १६ व्या हंगामातील महाअंतिम सामन्याआधी ऋतुराज गायकवाडने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. येत्या ३ ते ४ जूनदरम्यान ऋतुराज गायकवाड लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ऋतुराज गायकवाड लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांना त्याची पत्नी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर ‘इनसाइडर स्पोर्ट्स डॉट इन’ने दिलेल्या वृत्तानुसार, ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचे नाव उत्कर्षा पवार असे आहे.

Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad Marriage : शुभमंगल सावधान! ऋतुराज गायकवाडच लग्न ठरलं पण...

गेल्या काही वर्षांपासून ते दोघेही एकमेकांना ओळखतात. ते अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जात आहे. गेल्यावर्षी उत्कर्षा आणि ऋतुराज एकत्र जिममध्ये दिसले होते. त्यांनी याचा एक फोटोही शेअर केला होता. त्यानंतर त्यांचं अफेअर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या फायनलनंतर आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. तर लग्नामुळे मुंबईचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियामध्ये सामील होण्याची संधी मिळाली आहे.

ऋतुराज गायकवाडच्या जागी यशस्वीला संधी मिळाली आहे. ऋतुराजने बोर्डाला कळवले आहे की 3-4 जून रोजी त्याचे लग्न होत आहे आणि यामुळे तो WTC फायनलसाठी संघात सामील होणार नाही.

Ruturaj Gaikwad
Who Is Mystery Girl Utkarsha : कोण आहे मिस्ट्री गिल उत्कर्षा? धोनीचा पॉवर हिटर कोणासोबत करणार लग्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com