Shreyas Iyer blamed for Punjab Kings’ IPL 2025 loss : पंजाब किंग्सला ११ वर्षानंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ जिंकण्याची संधी मिळाली होती. आयपीएलचे पहिल्या जेतेपदासाठी तेही उत्सुक होते, परंतु फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अनपेक्षित खेळ केला आणि पंजाबकडून जेतेपद हिसकावून घेतले. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने संपूर्ण हंगामात दमदार कामगिरी केली, परंतु फायनलमध्ये RCB ने त्यांना हार मानण्यास भाग पाडले. अय्यरने RCBच्या कृणाल पांड्याने त्यांच्याहातून मॅच खेचून नेली असे म्हटले, परंतु पंजाब किंग्सच्या पराभवाला कर्णधारच जबाबदार असल्याचा आऱोप आता होतोय.