IPL 2022: सीएसकेच्या मोईन अलीला मिळाला व्हिसा मात्र...

CSK All Rounder Moeen Ali Got Visa
CSK All Rounder Moeen Ali Got Visa esakal

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला (Moeen Ali) व्हिसा मिळाला (Visa Approval) नसल्याने तो चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) आयपीएल 15 व्या हंगामाचा (IPL 2022) सलामीचा सामना खेळू शकणार नव्हता. मात्र क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार मोईन अलीला दीर्घ प्रतिक्षेनंतर व्हिसा मिळाला आहे. मोईन अलीने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात जवळपास महिनाभर आधी व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र त्याला वेळेत हा व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे तो 26 मार्च रोजी होणाऱ्या आयपीएल हंगामाच्या सलामी सामन्याला मुकावे लागणार होते.

CSK All Rounder Moeen Ali Got Visa
टीम इंडियाची डोकेदुखी ठरलेले हे 5 प्रश्न IPLमधून सुटणार का?

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आज म्हणजे 24 मार्च रोजी मोईन अलीला व्हिसा मिळाला आहे. याबाबत मोईन अलीचे वडील मुनिर अली यांनी सांगितले की, मोईन अलाली विजा मिळाला आहे.' तर सीएसकेचे सीईओ कैसी विश्वनाथन यांनी सांगितले की, 'उड्डाण करण्यासाठी सज्ज आहे. तो मुंबईत संध्याकाळपर्यंत पोहचेल. त्यानंतर तो थेट विलगीकरणात जाईल.'

CSK All Rounder Moeen Ali Got Visa
IPL 2022: कोहली पुन्हा होणार कर्णधार? वरिष्ठ खेळाडूच्या वक्तव्याने चर्चेला ऊत

विश्वनाथन पुढे म्हणाले की, 'जरी मोईन अली भारतात दाखल होत असला तरी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही. मात्र आम्हाला मोईन अलीच्या व्हिसाबाबत निर्माण झालेला संभ्रम संपल्याचा आनंद आहे.' मोईन अलीच्या व्हिसाचा प्रश्न उपस्थित झाल्याने त्याच्या वडिलांना आश्चर्य व्यक्त केले होते. मोईन अली हा सातत्याने भारतात येतोय त्यामुळे त्याच्या व्हिसाबाबत झालेली दिरंगाई ही धक्कादायक असल्याचे मत वडिलांनी व्यक्त केले होते.

मोईन अलीला चेन्नई सुपर किंग्जने लिलावापूर्वीच रिटेन केले होते. त्याला फ्रेंचायजीने 8 कोटी रूपये देऊन रिटेन केले. याचबरोबर सीएसकेने रविंद्र जडेजा (16 कोटी), एमएस धोनी (12 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी) यांना देखील रिटेन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com