IPL 2023 : 'तरीही ते मला सर्वोत्कृष्ट झेलचा पुरस्कार देत नाहीत...' विजयानंतर धोनीने काढला आपला राग

CSK vs SRH: MS Dhoni jokes about not getting best catch award
CSK vs SRH: MS Dhoni jokes about not getting best catch award

MS Dhoni IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीग मध्ये चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादवर सात गडी राखून सामना जिंकत विजय रथ सुरू ठेवला आहे, या सामन्यात रवींद्र जडेजा आणि डेव्हन कॉनवे यांनी आपल्या शानदार खेळाने सर्वांचीच लाइमलाइट लुटली.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर हसत हसत धोनीने सादरीकरणात कॅच ऑफ द मॅच पुरस्काराची मागणी केली. धोनी म्हणाला की, उत्तम झेल घेऊनही त्याला पुरस्कार मिळत नाही. फक्त तो यष्टिरक्षक आहे म्हणून, पण तो सोपा झेल नव्हता.

CSK vs SRH: MS Dhoni jokes about not getting best catch award
CSK vs SRH : कॉन्वे होता म्हणून... हैदराबादने 135 धावातही चेन्नईला 19 व्या षटकापर्यंत झुंजवले

खरे तर काल रात्री चेन्नई आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात धोनीने स्टंपच्या मागे जबरदस्त चपळाई दाखवली. मयंक अग्रवालविरुद्ध जबरदस्त स्टंपिंग असो किंवा तिक्ष्णाच्या चेंडूवर विरोधी कर्णधार एडन मार्करामचा झेल असो. धोनी अप्रतिम होता.

धोनीने आपण म्हातारे होत आहोत हे मान्य करायला मागेपुढे पाहिले नाही आणि त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समाचार घेतला. भारतीय दिग्गजाचे कौतुक करताना तो म्हणाला, "जसे जसे तुम्ही मोठे होत जाल, तसतसे तुम्ही अधिक अनुभवी होत जाल, जोपर्यंत तुम्ही सचिन पाजी नसता, ज्याने वयाच्या 16-17 व्या वर्षी खेळायला सुरुवात केली."

CSK vs SRH: MS Dhoni jokes about not getting best catch award
IPL 2023 : 'हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा...' विजयानंतर धोनीच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केल्यानंतर धोनी म्हणाला, 'दुसरं काय बोलावं. आता मी काही बोललो, हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आहे. दोन वर्षांनंतर चाहत्यांना इथे येऊन पाहण्याची संधी मिळाली आहे. येथे खेळणे छान आहे. प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. फलंदाजीची फारशी संधी मिळत नाही, पण तक्रार नाही. येथे मला प्रथम क्षेत्ररक्षणाचा संकोच वाटत होता कारण मला वाटले की जास्त दव राहणार नाही. आमच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली आणि वेगवान गोलंदाजांनी, विशेषत: पाथिरानानेही चांगली गोलंदाजी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com