इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पर्वातून बाहेर फेकला जाणाऱ्या पहिल्या संघाचा 'नकोसा' मान चेन्नई सुपर किंग्सने पटकावला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली CSK ला या पर्वात काही खास सुरुवात करता आली नव्हती. त्यात ऋतुराजला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली अन् सूत्र MS Dhoni च्या हाती आली. आता तरी चमत्कार होईल, असे चाहत्यांना वाटले. पण, हा संघ १० पैकी ८ सामन्यांत पराभवाचे तोंड पाहून आला. त्यापैकी पाच पराभव हे त्यांच्या घरच्याच मैदानावर म्हणजे चेपॉकवर झाल्याने नामुष्की ओढावली आहे. आयपीएल लिलावात फसलेले डावपेच अंगलट आल्याचे स्पष्ट झाले.