IPL 2024 DC vs KKR : पंत - स्टब्जची झुंजार अर्धशतके तरी केकेआरने दिल्लीचा केला मोठा पराभव

IPL 2024 DC vs KKR Scorecard : कोलाकाता नाईट रायडर्सने दिल्लीला त्यांच्याच होम ग्राऊंडवर पराभवाची धूळ चारली.
kkr Defeat DC in ipl 2024
kkr Defeat DC in ipl 2024 esakal

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders IPL 2024 :

आयपीएलच्या 16 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी पराभव केला. केकेआरने दिल्लीसमोर विजयासाठी 273 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र दिल्लीचा संपूर्ण संघ 166 धावात तंबूत परतला.

दिल्लीकडून ऋषभ पंतने 25 चेंडूत 55 तर ट्रिस्टन स्टब्जने 32 चेंडूत 54 धावा करत झुंज दिली. मात्र इतर फलंदाजांनी नांगी टाकल्याने दिल्लीचा मोठा पराभव झाला. केकेआरकडून वैभव अरोरा, वरूण चक्रवर्तीने प्रत्येकी 3 तर मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या.

आयपीएलच्या 16 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध 20 षटकात 272 धावा ठोकून आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. केकेआरकडून दोन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. सुनिल नारायणने 39 चेंडूत 85 धावा केल्या. तर अंगक्रिश रघुवंशीने 54 धावांची खेळी केली.

IPL 2024 DC vs KKR Live Score : ऋषभ पंतचे अर्धशतक, दिल्लीचेही केकेआरला चोख प्रत्युत्तर

ऋषभ पंतने 25 चेंडूत 55 धावांची खेळी करत दिल्ली कॅपिटल्सची झुंज कायम ठेवली. त्याने ट्रिस्टन स्टब्जसोबत पाचव्या विकेटसाठी 93 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. अखेर पंतची खेळी चक्रवर्तीने संपवली. त्यानंतर स्टब्जने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं. त्याने दिल्लीला 15 व्या षटकात 160 धावांचा टप्पा पार करून दिला.

IPL 2024 DC vs KKR Live Score : पंत अन् स्टब्जची झुंज मात्र सामन्यावर केकेआरचीच पकड

केकेआरच्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. पॉवर प्लेमध्येच त्यांची अवस्था 4 बाद 33 धावा अशी झाली होती. मात्र त्यानंतर आलेल्या ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्ज यांनी तडाखेबाज फलंदाजी करत कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला.

IPL 2024 DC vs KKR Live Score : रसेलचा तडाखा तर रिंकूचा धमाकूळ

रिंकू सिंहने 8 चेंडूत 26 धावा आणि आंद्रे रसेलने 19 चेंडूत 41 धावा ठोकल्या. त्यामुळे केकेआरने 20 षटकात 7 बाद 272 धावा केल्या.

IPL 2024 DC vs KKR Live Score : केकेआरने 15 व्या षटकातच पार केलं द्विशतक; रसेल स्लॉग ओव्हरमध्ये घालणार धुमाकूळ?

केकेआरने दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात 15 षटकातच 200 धावांचा टप्पा पार केला आहे. शेवटच्या पाच षटकात आंद्रे रसेल आणि श्रेयस अय्यर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील असतील.

IPL 2024 DC vs KKR Live Score : नारायण पाठोपाठ रघुवंशीचेही अर्धशतक; 13 षटकात 175 धावा पार

सुनिल नारायणने 39 चेंडूत 85 धावा ठोकल्यानंतर अंगक्रिश रघुवंशीने देखील आपले अर्धशतक ठोकले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी रचली. रघुवंशी 27 चेंडूत 54 धावा करून बाद झाला.

IPL 2024 DC vs KKR Live Score : नारायणनं पहिल्या 9 षटकातच दिल्लीची अवस्था केली खराब

सुनिल नाराणयनने 28 चेंडूत 68 धावा ठोकत केकेआरला 9 षटकातच 126 धावांपर्यंत मजल मारून दिली. यामुळे आजच्या सामन्यात दिल्लीसमोर मोठे आव्हान असणार हे पहिल्या 10 षटकातच स्पष्ट झालं आहे.

IPL 2024 DC vs KKR Live Score : सुनिल नारायणचे आक्रमक अर्धशतक, केकेआरने पॉवर प्लेमध्ये ठोकल्या 88 धावा

सुनिल नारायणने दमदार अर्धशतक ठोकत केकेआरला पॉवर प्लेमध्ये 88 धावांची सुरूवात करून दिली.

IPL 2024 DC vs KKR Live Score : दिल्लीला नॉर्खियाने दिला दिलासा, सॉल्ट झाला बाद

पॉवर प्लेच्या 5 षटकातच 60 धावा ठोकणाऱ्या सलामीवीर फिल्प सॉल्ट आणि सुनिल नारायण ही जोडी अखेर नॉर्खियाने फोडली. त्याने सॉल्टला 18 धावांवर बाद केलं.

IPL 2024 DC vs KKR Live Score : केकेआरची तडाखेबाज सुरूवात, नारायण अन् सॉल्टनं संघाला पार करून दिलं अर्धशतक

सुनिल नारायण आणि फिल्प सॉल्ट यांनी केकेआरला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पॉवर प्लेच्या 4 षटकातच संघाला अर्धशतक (58 धावा) पूर्ण करून दिले. नारायणने 15 चेंडूत 34 धावा ठोकल्या. तर सॉल्टने 9 चेंडूत 16 धावा चोपल्या.

IPL 2024 DC vs KKR Live Score : केकेआरच्या अय्यरनं नाणेफेक जिंकली; दिल्लीला सामन्यापूर्वी दुखापतीचा मोठा फटका

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात केकेआरने आपल्या संघात एक बदल केला असून रघुवंशीला संधी मिळाली आहे. तर दिल्लीला दुखापतीचा फटका बसला असून मुकेश कुमार दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. त्याच्या ऐवजी सुमित कुमार प्लेईंग 11 मध्ये खेळणार आहे.

IPL 2024 DC vs KKR Live Score : कोलकाता मारणार का बा जी... की श्रेयशवर ऋषभ पंत पडणार भारी? थोड्याच वेळात रंगणार सामना

या सामन्यातील चार सुपरस्टार्सबद्दल बोलायचे तर.... दोन्ही संघातील दोन मोठे खेळाडू कोण असू शकतात? गेल्या सामन्यात सुनील नरेनने बॉल आणि बॅट या दोन्हीत आश्चर्यकारक कामगिरी केली होती. याशिवाय आंद्रे रसेलवरही नजर असेल.

दुसरीकडे दिल्लीसाठी गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा कर्णधार ऋषभ पंत आणि शानदार गोलंदाजी करणाऱ्या खलील अहमदवर सर्वांची नजर असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com