दिल्लीचे 'यादव' पडले भारी; 'सालाबाद' प्रमाणेच मुंबईची सुरूवात

Delhi Capitals Beat Mumbai Indians IPL 2022
Delhi Capitals Beat Mumbai Indians IPL 2022Esakal

मुंबई: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदा आपला आयपीएलमधील प्रघात तोडणार असे वाटते होते. त्यांनी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध 177 धावांचे चांगले आव्हान ठेवले होते. त्यानंतर दिल्लीची अवस्था 6 बाद 104 अशी केली होती. मात्र जयंत यादवने (Jayant Yadav) 38 चेंडूत 48 धावांची खेळी केली. त्याला डावखुऱ्या अक्षर पटेलने (Axar Patel) 17 चेंडूत 38 धावा चोपून मोलाची साथ दिली. या दोघांनी दिल्लीला पराभवाच्या दाढेतून खेचून काढले आणि 19 व्या षटकातच विजयी मुकूट चढवला. मुंबईला गोलंदाजी करताना जयंत यादवने तर फलंदाजी करताना कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) चांगलेच सतावले. कुलदीपने रोहित, पोलार्डसह मुंबईच्या तीन फलंदाजांची शिकार केली.

Delhi Capitals Beat Mumbai Indians IPL 2022
IPL 2022: सेमी फायनलबाबत गावसकर-हेडनची भविष्यवाणी; मुंबईला वगळले

मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी धडाकेबाज सुरूवात करत दिल्ली टेन्शन देण्यास सुरूवात केली होती. मात्र दिल्लीचे हे टेन्शन चायनामन बॉलर कुलदीप यादवने दूर केले. त्याने रोहित शर्मा (41) बाद करत मोठा धक्का दिला. त्यानंतर अनमोलप्रीतलाही बाद करत मुंबईच्या टॉप आर्डरला दुसरा धक्का दिला. मुंबईला या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच कुलदीपने अजून एक धक्का दिला. त्याने हार्ड हिटर कायरन पोलार्डला अवघ्या 3 धावांवर बाद केले.

त्यानंतर इशान किशनने एकहाती डाव सावरत मुंबईला 177 धावांपर्यंत पोहचवले आणि आपल्या गोलंदाजांना फाईट करण्यासाठी बऱ्यापैकी धावा करून दिल्या. त्याने 48 चेंडूत 81 धावांची खेळी केली.

Delhi Capitals Beat Mumbai Indians IPL 2022
IPL 2022: दोन यादवांनी काढली सीएसके - मुंबईची हवा

दिल्ली डोक्यावर 177 धावांनी टार्गेट घेऊन मैदानात उतरली त्यावेळी त्यांची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. मुर्गन अश्विनने सुरूवातीला दिल्लीला धक्के दिले. त्यातून दिल्ली सावरते ना सावरते तोच बेसल थंम्पीने आग ओकत दिल्लीची अवस्था 6 बाद 104 अशी केली. दिल्ली पराभवाच्या खाईत गेली असतानाच दिल्लीसाठी दुसरा यादव धावून आला. जयंत यादवने दिल्लीचा डाव सावरत पहिल्यांदा शार्दुल ठाकूरबरोबर (22) नंतर अक्षर पटेलबरोबर महत्वपूर्ण भागीदारी रचली. अक्षर पटेलने 17 चेंडूत 38 धावा करून दिल्लीचा विजय आणखी सोपा केला. जयंत यादवने अँकर इनिंग खेळत 38 चेंडूत 48 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com