
दिल्लीचा पाय आणखी खोलात; CSK सोबतच्या सामन्याआधीच संघाला झटका...
CSK vs DC Today IPL Match: आयपीएलच्या 55 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आज संध्याकाळी खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी दिल्ली संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा नेट बॉलर कोरोना पॉझिटिव्ह (Delhi Capitals Net Bowler Testing Positive) आला आहे. बीसीसीआयने आयपीएल 2022 साठी तयार केलेल्या कोरोना प्रोटोकॉलनुसार, दिल्ली कॅपिटल्सला कोरोना चाचणीच्या दुसर्या फेरीतून जावे लागणार आहे. तोपर्यंत सर्व खेळाडू खोल्यांमध्ये एकटे राहतील.
सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सच्या नेट बॉलरला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. टीम हॉटेल रूममध्ये त्याच्यासोबत राहिलेल्या गोलंदाजालाही होम आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्स सध्या 10 पैकी 5 विजय आणि 5 पराभवांसह पाचव्या क्रमांकावर आहे. डीसीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांचाही यापूर्वी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पाँटिंगला काही सामन्यांना मुकावे लागले होते. याशिवाय परदेशी खेळाडूंमध्ये टिम सेफर्ट, मिचेल मार्श आणि सपोर्ट स्टाफच्या ४ सदस्यांनाही गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. टीममध्ये कोरोनाचे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यांचे वेळापत्रक आणि ठिकाणही बदलण्यात आले होते.