DC vs LSG : लखनौने दिल्ली केली सर; पाहा Highlights | Delhi Capitals vs Lucknow Super Giants | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Delhi Capitals vs Lucknow Super Giants 45th Match Live

DC vs LSG : लखनौने दिल्ली केली सर; पाहा Highlights

IPL 2022, DC vs LSG: लखनौ सुपर जायंटने शेवटच्या सामन्यापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 6 धावांनी पराभव केला. लखनौने 20 षटकात 3 बाद 195 धावा ठोकल्या होत्या. मात्र दिल्लीने 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. लखनौकडून केएल राहुलने सर्वाधिक 77 धावा केल्या. तर दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट घेतल्या. या धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीच्या फलंदाजीला मोहसीन खानने भेदक मारा करत सुरूंग लावला. त्याने 4 विकेट घेतल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने 24 चेंडूत 42 धावा करत एकाकी झुंज दिली.

पाहा हाईलाईट्स

148-7 : शार्दुल ठाकूर कडून  निराशा

मोहसीन खानने दिल्लीचा धोकादायक अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला 1 धावेवर बाद केले. मोहसीन खानने दिल्लाचा चौथा फलंदाज गारद केला.

146-6 : आक्रमक पॉवेल झाला बाद 

मोहसीन खानने दिल्लीला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली. त्याने 21 चेंडूत 35 धावा करणाऱ्या रोव्हमन पॉवेलला बाद करत दिल्लीची अवस्था 6 बाद 146 धावा अशी केली.

120-5 : कर्णधार पॅव्हेलियनमध्ये परतला

मोहसीन खानने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतचा 44 धावांवर असताना त्रिफाळा उडवला. याचबरोबर दिल्ली मोठा धक्का बसला.

86-4 : ललित यादवचा रवी बिश्नोईने उडवला त्रिफळा

73-3 : गौतमने फोडली जोडी

कृष्णाप्पा गौतमने दिल्लीची जमलेली जोडी फोडली. त्याने मिशेल मार्शला 37 धावांवर बाद केले.

मिशेल मार्श-ऋषभ पंतने डाव सावरला

अवघ्या 13 धावांवर दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर दिल्लीचा डाव मिशेल मार्श आणि कर्णधार ऋषभ पंतने सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 25 चेंडूत 60 धावांची भागीदारी रचली.

13-2 दिल्लीला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के

लखनौचे 195 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरूवात खराब झाली. धावफलकावर 13 धावा लागल्या असतानाच त्यांचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. पृथ्वी शॉला चमीराने 5 तर डेव्हिड वॉर्नरला मोहसीन खानने 3 धावांवर बाद केले.

195-3 (20 Ov) : लखनौने मारली मोठी मजल

कर्णधार केएल राहुलच्या 77 तर दीपक हुड्डाच्या 52 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंटने दिल्ली विरूद्ध 195 धावांचा डोंगर उभारला. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट घेतल्या.

176-3 : ठाकूरने केली राहुलची शिकार

51 चेंडूत 77 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या केएल राहुलला अखेर शार्दुल ठाकूरने बाद केले.

137-2 : जोडी ब्रेकर शार्दुलने अखेर जलावा दाखवला

केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी दुसऱ्या विकेटसाठी दमदार 94 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी शंभरी गाठण्यापूर्वीच शार्दुल ठाकूरने दीपक हुड्डाला 52 धावांवर बाद केले.

राहुल पाठोपाठ दीपक हुड्डाचे देखील अर्धशतक

सलामीवीर केएल राहुलच्या अर्धशतकापाठोपाठ दीपक हुड्डाने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले.

केएल राहुलचे दमदार अर्धशतक

लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलने 35 चेंडूत अर्धशतक ठोकत संघाला बळकटी मिळवून दिली.

LSG 105-1 : राहुल - हुड्डाने लखनौला पार करून दिला शतकी टप्पा

केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत लखनौ सुपर जायंटला 11 व्या षटकात शंभरी पार करून दिली.

 • 42/1 - लखनौला डी कॉकच्या रूपात पहिला धक्का

  शार्दुल ठाकूरने आपल्या पहिल्याच षटकात दिल्लीला यश मिळवून दिले आहे. क्विंटन डी कॉक २३ धावा करत झेलबाद झाला.

 • दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन

  पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत, ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया

 • लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन

  क्विंटन डी कॉक, केएल राहुल, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, जेसन होल्डर, दुष्मंता चमीरा, मोहसिन खान, रवी बिश्नोई

 • लखनौने नाणेफेक जिंकली, दिल्लीचा संघ प्रथम गोलंदाजी करणार

  लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Delhi Capitals Vs Lucknow Super Giants 45th Match Live Cricket Score Highlights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top