DC vs SRH : हैदराबादने दिल्लीचा केला 9 धावांनी पराभव

DC vs SRH Live
DC vs SRH Live esakal

DC vs SRH : सनराईजर्स हैदराबादने आपल्या घरच्या पराभवाचा बदला दिल्लीच्या होम ग्राऊंडवर घुसून घेतला. अरूण जेटली स्टेडियमवर हैदराबादने दिल्लीचा 9 धावांनी पराभव करत दिल्लीला तळातच ठेवले. हैदराबादने ठेवलेल्या 198 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या झुंजार फलंदाजांनी 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 188 धावांपर्यंत मजल मराली. मिचेल मार्शने 63 तर फिल्प सॉल्टने 59 धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र हे दोघे बाद झाल्यावर दिल्लीची गाडी घसली.

नाणेफेक जिंकून प्रथम फंलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादच्या फक्त दोन फलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला जेरीला आणले. सलामीवीर अभिषेक शर्मा (67) आणि हेन्रिच क्लासेनने (53) अर्धशतकी खेळी करत हैदराबादला 20 षटकात 6 बाद 197 धावांपर्यंत पोहचवले. दिल्लीकडून मिचेल मार्शने भेदक मारा करत 4 षटकात 27 धावा देत 4 फलंदाज बाद केले. दिल्लीचे मुकेश कुमार, नॉर्त्जे आणि इशांत शर्मा हे महागडे ठरले.

125-4 : हैदराबादचे जोरदार पुनरागमन 

दिल्लीला विजयसाठी 41 चेंडूत 73 धावांची गरज असताना सेट झालेला मिचेल मार्श 63 धावा करून बाद झाला. त्याला अकिल हुसैनने बाद केले.

दिल्लीला पहिल्याच षटकात धक्का

सनराईजर्स हैदराबादचे 198 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याने कर्णधार डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्याच चेंडूवर शुन्यावर बाद केले.

समाद - क्लासेन जोडी जमली

मिचेल मार्शने हैदराबादला पाठोपाठ धक्के दिल्यानंतर अब्दुल समाद आणि क्लासेन यांनी सहाव्या विकेटसाठी जवळपास 5 षटकात अर्धशतकी भागीदारी रचत हैदराबादला 160 धावांच्या पार पोहचवले. मात्र ही जोडी अखेर मार्शनेच फोडली. त्याने 21 चेंडूत 28 धावा करणाऱ्या समादला घरचा रस्ता दाखवला.

दिल्लीने हैदराबादला दिले धक्के

एकीकडे अभिषेक शर्मा आक्रमक अवतारात फलंदाजी करत होता दुसरीकडे मिचेल मार्श हैदराबादला धक्क्यावर धक्के देत होता. आधीच राहुल त्रिपाठीची शिकार केलेल्या मार्शने हैदराबादचा कर्णधार एडिन माक्ररमला 8 धावांवर आणि हॅरी ब्रुकला शुन्यावर बाद केले. यानंतर अभिषेक शर्मा 36 चेंडूत 63 धावा करून अक्षर पटेलची शिकार झाला.

अभिषेक शर्माचा धडाका मात्र दिल्लीनेही दिले धक्के

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने धडाकेबाज सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने पॉवर प्लेचा चांगलाच फायदा उचलला. मात्र मयांक अग्रवालला मात्र 6 चेंडूत 5 धावाच करता आल्या. त्याला इशांत शर्माने घरचा रस्ता दाखवला.

यानंतर आलेला राहुल त्रिपाठी देखील फार काही चमक दाखवू शकला नाहीत 6 चेंडूत 10 धावा करत तो मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र यानंतर अभिषेक शर्माने फटकेबाजी करत 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर जवळपास 10 च्या रनरेटने संघाला 8 षटकात 76 धावांच्या जवळ पोहचवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com