DC vs CSK : चेन्नईने दिल्लीची केली धुलाई! कॉन्वे, ऋतुराजने केला धमाका, जडेजा अन् दुबेनेही हात घेतले धुवून

Devon Conway Ruturaj Gaikwad Delhi Capitals vs Chennai Super Kings
Devon Conway Ruturaj Gaikwad Delhi Capitals vs Chennai Super Kingsesakal

Devon Conway Ruturaj Gaikwad Delhi Capitals vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्जने आपल्या लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची चांगलीच धुलाई केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने 20 षटकात 3 बाद 223 धावा केल्या. यात सलामीवीर डेवॉन कॉन्वेने 51 चेंडूत 87 धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने 79 धावा केल्या. शिवम दुबेने 9 चेंडूत 22 तर रविंद्र जडेजाने 7 चेंडूत 20 धावा करत आपले हात धुवून घेतले.

Devon Conway Ruturaj Gaikwad Delhi Capitals vs Chennai Super Kings
IPL 2023 MI Playoffs Scenario : रोहितच्या मुंबई इंडियन्सचा पाय खोलात! प्लेऑफसाठी हा एकमेव मार्ग

दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेने पॉवर प्लेमध्ये 52 धावांची नाबाद सलामी देत सीएसकेला आश्वासक सुरूवात करून दिली.

चेन्नईला पॉवर प्लेमध्ये अर्धशतकी मजल मारून देणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेने आपला धडाका पॉवर प्लेनंतरही कायम ठेवला. या दोघांनी अर्धशतकी खेळी करत चेन्नईसाठी शतकी भागीदारी रचली. ऋतुराजने षटकारांची बरसात करत 50 चेंडूत 79 धावा चोपल्या. अखेर त्याची खेळी 15 व्या षटकात चेतन साकरियाने संपवली. मात्र तोपर्यंत चेन्नईन 150 च्या जवळ पोहचली होती. कॉन्वे आणि ऋतुराजने 141 धावांची सलामी दिली.

Devon Conway Ruturaj Gaikwad Delhi Capitals vs Chennai Super Kings
Shikhar Dhawan : पंजाब किंग्ज IPL 2023 मधून बाहेर होताच शिखर धवन संतापला, म्हणाला...

ऋतुराज 79 धावांवर बाद झाल्यानंतर अर्धशतक पूर्ण केलेल्या डेवॉन कॉन्वेने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. ऋतुराज षटकारांची लयलूट करत होता. तर कॉन्वेने चौकारांचा पाऊस पाडला. त्याला साथ देणाऱ्या शिवम दुबेची खेळी 9 चेंडूतच संपुष्टात आली. मात्र या 9 चेंडूत दुबेने 22 धावा चोपल्या होत्या. 19 वे षटक आले त्यावेळी चेन्नईने 200 च्या उंबरठ्यावर पोहचली होती.

आता धोनी क्रिजवर आला होता. मात्र तोपर्यंत डेवॉन कॉन्वे 52 चेंडूत 87 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार मारले. यानंतर शेवटच्या दोन षटकात रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी 28 धावा करत चेन्नईला 223 धावांपर्यंत पोहचवले. जडेजाने 7 चेंडूत नाबाद 20 धावा ठोकल्या.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com