
MS Dhoni Deepak Chahar viral video : चेन्नई सुपर किंग्जने (CSK) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या त्यांच्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर (MI) 4 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना 23 मार्च रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. नूर अहमदच्या अप्रतिम 4 विकेट्स आणि खलील अहमदच्या 3 विकेट्सच्या जोरावर मुंबई इंडियन्सला 155/9 च्या मर्यादित धावसंख्येवर रोखण्यात आले. मॅचनंतर एमएस धोनी आणी दीपक चहर एक व्हिडिओ तुफान वायरल होत आहे. ज्यामध्ये धोनी जूना सहकारी चहरला बॅटने मारताना पाहायला मिळत आहे.