IPL 2021 FINAL: कार्तिकने डू प्लेसिसला दिलेलं जीवदान KKRला पडलं भारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL FINAL: कार्तिकने डू प्लेसिसला दिलेलं जीवदान KKRला पडलं भारी

CSK vs KKR: फाफ डू प्लेसिसने कोलकाताच्या गोलंदाजांची काढली पिसं

IPL FINAL: कार्तिकने डू प्लेसिसला दिलेलं जीवदान KKRला पडलं भारी

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 FINAL CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये विजेतेपदाची लढत सुरू आहे. या स्पर्धेत आज कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कोलकाताच्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवण्याचा संधी शाकीब अल हसनने दिली होती, पण दिनेश कार्तिकची एक KKR ला पहिल्या डावात भारी पडली आणि फाफ डू प्लेसिसने कोलकातावर हल्ला चढवला.

हेही वाचा: MS धोनी... जगात भारी! क्रिकेटच्या इतिहासात केला विश्वविक्रम

फाफ डू प्लेसिस २ धावांवर असताना दिनेश कार्तिकने त्याच्या स्टंपिंगची संधी सोडली. शाकिब अल हसनने टाकलेला चेंडू डू प्लेसिसला कळला नव्हता. तीच गत कार्तिकची झाली. त्याला काहीही कळण्याआधी चेंडू हातून निघून गेला आणि डू प्लेसिसला जीवनदान मिळालं. याचा डू प्लेसिसने जोरदार फायदा करून घेतला. त्याने ३५ चेंडूत दमदार अर्धशतक तर झळकावलंच. पण त्यासोबतच शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात तग धरून ५९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८६ धावांची दमदार खेळी केली.

पाहा VIDEO-

दरम्यान, फायनल्स खेळण्याचा तगडा अनुभव असलेल्या CSK ने यंदाच्या फायनलमध्येही दमदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने KKR ला १९३ धावांचे आव्हान दिले. फाफ डू प्लेसिसची ५९ चेंडूत ८६ धावांची खेळी आणि त्याला ऋतुराज (३२), रॉबिन उथप्पा (३१) आणि मोईन अली (३७*) यांनी दिलेली साथ याच्या जोरावर CSK ने ३ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली.

loading image
go to top