MS धोनी... जगात भारी! क्रिकेटच्या इतिहासात केला विश्वविक्रम | MS Dhoni | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni

धोनीने मैदानात पाऊल ठेवताच रचला भीमपराक्रम

MS धोनी... जगात भारी! क्रिकेटच्या इतिहासात केला विश्वविक्रम

IPL 2021 FINAL CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये विजेतेपदाची लढत सुरू आहे. KKR ने नाणेफेक जिंकत प्रथम CSK ला फलंदाजीचे निमंत्रण दिलं. IPL स्पर्धेच्या इतिहासात चेन्नईच्या संघाने ९ वेळा फायनल सामना खेळला असून त्यांच्या नावावर ३ विजेतेपदं आहेत. तर कोलकाताने २ वेळा फायनल सामना खेळला असून दोन्ही वेळा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे आज कोलकाता चेन्नईची बरोबरी करणार की CSK विजेतेपदाचा चौकार लगावणार, याकडे साऱ्या क्रिकेटरसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे. याच दरम्यान, CSK चा थलाईवा महेंद्रसिंग धोनी याने क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम रचला.

हेही वाचा: IPL FINAL: CSKच्या 'या' ५ क्रिकेटपटूंवर असेल फॅन्सची खास नजर

महेंद्रसिंग धोनी कोलकाताविरूद्ध सुरू असलेल्या फायनलमध्ये कर्णधार म्हणून आपला ३००वा T20 सामना खेळण्यासाठी उतरला. आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासात ३०० टी२० सामन्यात कोणत्याही कर्णधाराने नेतृत्व केलेले नाही. पण धोनीने मात्र टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स या तीन संघांकडून संघाचे कर्णधारपद भूषवले.

हेही वाचा: IPL FINAL Live: KKRने टॉस जिंकला; CSKची प्रथम फलंदाजी

धोनीचं T20 कर्णधारपदाची कारकीर्द

  • टीम इंडिया: ७२ सामने - ४१ विजय - २८ पराभव

  • चेन्नई (CSK): २१३ सामने - १३० विजय - ८१ पराभव

  • पुणे (RPS): १४ सामने - ५ विजय - ९ पराभव

जाडेजा, डू प्लेसिस आणि रायुडू साठीही खास सामना

धोनीसह रविंद्र जाडेजा, फाफ डू प्लेसिस आणि अंबाती रायुडू या तिघांसाठीही आजचा सामना खास आहे. रविंद्र जाडेजा आज २००वा तर अंबाती रायुडू १७५वा IPL सामना खेळत आहे. त्यासोबतच फाफ डू प्लेसिस CSKकडून आपला १००वा सामना खेळत आहे.

loading image
go to top