Impact of India-Pakistan war on IPL schedule and foreign players
भारत-पाकिस्तान सीमेवर वाढलेल्या तणावामुळे काल धर्मशाला येथील पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना मध्येच थांबवण्यात आला. काल रात्रभर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर हल्ले सुरू होते आणि भारतीय सैन्याने पाकिस्तानची घाबरगुंडी उडेल, अशी कारवाई केली. पण, या वाढलेल्या तणावामुळे इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पुढील सामन्यांवरही संकट ओढावले आहे. IPL 2025 मध्ये सहभागी असलेल्या परदेशी खेळाडूंना लवकरात लवकर त्यांच्या घरी जायचे आहे.