IPL 2024 RCB vs GT : बंगळूर संघाचा चौथा विजय ; गतउपविजेत्या गुजरातची घसरण कायम

बंगळूर संघाने गतउपविजेत्या गुजरातचा चार विकेटने पराभव केला आणि आयपीएलमधील आपल्या चौथ्या विजयाची नोंद केली. तरीही प्लेऑफ गाठणे त्यांच्यासाठी अशक्यच असणार आहे.
IPL 2024 RCB vs GT
IPL 2024 RCB vs GTsakal

बंगळूर : बंगळूर संघाने गतउपविजेत्या गुजरातचा चार विकेटने पराभव केला आणि आयपीएलमधील आपल्या चौथ्या विजयाची नोंद केली. तरीही प्लेऑफ गाठणे त्यांच्यासाठी अशक्यच असणार आहे.

आजच्या सामन्याअगोदर तळाच्या स्थानावर असलेल्या बंगळूरने या विजयाने आपल्या क्रमवारीत सुधारणा केली. ११ सामन्यांपैकी चौथा सामना जिंकून एकूण आठ गुण मिळवले. उर्वरित तिन्ही सामने जिंकले तरी त्यांच्यासाठी प्लेऑफ कठीण आहे. दुसऱ्या बाजूला गुजरातची या पराभवामुळे नवव्या स्थानावर घसरण झाली.

चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळूर संघाने गुजरातला १४७ धावांत गुंडाळले. खेळपट्टी संथ असल्यामुळे गुजरातच्या फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत, असा समज निर्माण झाला होता; परंतु बंगळूरने याच धावा ३८ चेंडू राखून पार केल्या.

२३ चेंडूत ६४ धावा करणाऱ्या फाफ डुप्लेसीने विराट कोहलीसह ५.५ षटकांत ९२ धावांची वेगवान सलामी दिली; पण त्यानंतर त्यांनी २६ चेंडूत पाच फलंदाज गमावले होते. अखेर स्वप्नील सिंग आणि दिनेश कार्तिक यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. तत्पूर्वी, मोहम्मद सिराजने गिलसह दुसरा सलामीवीर वृद्धिमन साहा यांना बाद केले त्यामुळे गुजरातची दोन बाद १० अशी अवस्था झाली तर कॅमेरून ग्रीनने साई सुदर्शनला परतीचा रस्ता दाखवला, त्यामुळे तीन बाद १९ अशा संकटात सापडलेल्या गुजरातचा डाव शाहरुख खान आणि डेव्हिड मिलर यांनी सावरण्याचा प्रयत्न केला.

IPL 2024 RCB vs GT
IPL 2024 Hardik Pandya : हार्दिकच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह ; ॲरॉन फिन्च, ग्रॅहम स्मिथ आणि शेन वॉटसनची टीका

कर्ण शर्माने मिलरची विकेट मिळवली तर कोहलीने शाहरुखला धावचीत केले, त्यानंतर गुजरातचा डाव अडखळतच राहिला. परिणामी, त्यांना पूर्ण २० षटके फलंदाजी करता आली नाही.

संक्षिप्त धावफलक

गुजरात : १९.३ षटकांत सर्वबाद १४७ (शाहरुख खान ३७ - २४ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, डेव्हिड मिलर ३० - २० चेंडू, ३ चौकार, २ षटकार, राहुल तेवटिया ३५ - ३१ चेंडू, ५ चौकार, १ षटकार मोहम्मद सिराज ४-०२९-२, यश दयाल ४-०-२१-२, विजयकुमार वैश्यक ३.३-०-२३-२)

बंगळूर १३.४ षटकांत ६ बाद १५२ (फाफ डुप्लेसी ६४ - २३ चेंडू, १० चौकार, ३ षटकार, विराट कोहली ४२ - २७ चेंडू, २ चौकार, ४ षटकार, दिनेश कार्तिक नाबाद २१ - १२ चेंडू, ३ चौकार, स्वप्नील सिंग नाबाद १५ - ९ चेंडू, २ चौकार, १ षटकार, जॉश लिटल ४-०-४५-४, नूर अहमद ४-०-२३-२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com