'इथे कमजोर संघाला जागा नाही' पराभवानंतर गंभीर ड्रेसिंग रूममध्ये संतापला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gautam gambhir angry lsg players

'इथे कमजोर संघाला जागा नाही' पराभवानंतर गंभीर ड्रेसिंग रूममध्ये संतापला!

आयपीएलमध्ये मंगळवारी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. लखनौ सुपर जायंट्सला गुजरात टायटन्स विरुद्ध 62 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर पराभवानंतर खूपच संतापला होता. त्यामुळे त्याने संपूर्ण संघाची जोरदार क्लास घेतला. लखनौ संघाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर गौतम गंभीरच्या खेळाडूंसोबतची क्लिप शेअर केली आहे.(Gautam Gambhir Angry lsg Players)

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघांना प्रथम प्लेऑफ गाठण्याची संधी होती. अवघ्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा संघ फक्त 82 धावांत गारद झाला आणि त्यांना 62 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. व्हिडिओ मध्ये गौतम गंभीर लखनौच्या खेळाडूंवर रागावताना दिसत आहे. गौतम गंभीर म्हणाला, सामना हरण्यात काहीही नुकसान नाही, एक संघ जिंकेल आणि एक हरेल. पण हार मानणे पूर्णपणे चुकीचे आहे. मला वाटतं आज आपण हार मानली होती. तो पुढे म्हणाला, आम्ही कमजोर होतो आणि खरे सांगायचे तर आयपीएलसारख्या टूर्नामेंट किंवा खेळात कमजोर संघाला स्थान नसते.

हेही वाचा: KKR च्या विजयानंतरही रहाणे वाईटरित्या ट्रोल; IPL करियर संपुष्टात?

लखनौने प्रथम गोलंदाजी करताना त्यांच्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे गुजरातला 4 बाद 144 धावांवर रोखले. पण फलंदाजीत मात्र संघ बुडताना दिसला. दीपक हुडा वगळता संघाचा एकही फलंदाज खेळू शकला नाही आणि संपूर्ण संघ 13.5 षटकांत 82 धावांत गारद झाला. गुजरातकडून लेगस्पिनर राशिद खानने 4 बळी घेतले.

Web Title: Gautam Gambhir Angry Lsg Players After Weak Performance Against Gujarat Titans Lsg Vs Gt Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLGautam GambhirIPL 2022
go to top