India Pakistan War नंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ आठवड्यासाठी स्थगित करावी लागली होती. वातावरण निवळले अन् बीसीसीआयने आयपीएल २०२५च्या उर्वरित सामन्यांचे सुधारित वेळापत्रक पुन्हा जाहीर केले. १७ मे पासून ही स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे आणि ३ जूनला अंतिम सामना होणार आहे. देशातील सहा विविध शहरांमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत. मुंबई इंडियन्सला आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे, कारण सहा विजयांची त्यांची मालिका मागील लढतीत गुजरात टायटन्सने खंडीत केली होती. त्यांना उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवणे गरजेचे आहे.