Mumbai Indians chances for Qualifier 1 after Chahal injury : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या क्वालिफायर १ चे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे या शर्यतीत आघाडीवर असलेल्या संघांना मागील साखळी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सला क्वालिफायर १ खेळण्याची संधी निर्माण झाली. त्यासाठी आज पंजाब किंग्सविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून मुंबईला क्वालिफायर १ च्या शर्यतीत आघाडी घेता येणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईसाठी आनंदाची बातमी आली आहे, कारण पंजाबचा स्टार खेळाडू जखमी झाला आहे आणि तो आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.