IPL 2023 : कर्णधार रोहित शर्माला चिंता गोलंदाजांची! गुजरात टायटन्सविरुद्ध अर्जुन तेंडुलकर बाहेर?

मागील लढतीत मुंबई इंडियन्सच्या चारही गोलंदाजांना ठसा उमटवता आला नाही...
Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2023
Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2023

Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2023 : मुंबई इंडियन्सला सलग तीन विजयांनंतर वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले. या लढतीत अखेरच्या पाच षटकांमध्ये पंजाब किंग्सकडून ९६ धावांचा पाऊस पाडण्यात आला. याच धावा जय-पराजय यामधील अंतर ठरल्या. याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सला गोलंदाजी विभागाची चिंता सतावू लागली आहे.

मुंबई इंडियन्सला आज अहमदाबादमध्ये होणाऱ्या लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना करावयाचा आहे. याप्रसंगी मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या विजयासाठी, तर गुजरात टायटन्सचा संघ तिसरा पराभव टाळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2023
Prithvi Shaw IPL 2023 : पृथ्वी शॉचा पगार ८ कोटी, ६ मॅच ४७ धावा! दिल्ली कॅपिटल्सने दाखवला बाहेरचा रस्ता

मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची धुरा जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ, कॅमेरुन ग्रीन व अर्जुन तेंडुलकर या चौघांवर आहे. मागील लढतीत या चारही गोलंदाजांना ठसा उमटवता आला नाही. पंजाबच्या फलंदाजांनी या चारही गोलंदाजांवर आक्रमण केले. आर्चर नुकताच दुखापतीमधून बरा होऊन संघात परतला होता. त्यामुळे त्याच्याकडून झटपट चांगली कामगिरीची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल; पण मुंबईसाठी हे चारही गोलंदाज अव्वल दर्जाची कामगिरी करणे गरजेचे आहे. पियूष चावला व ॠतिक शोकीन या फिरकी गोलंदाजांकडून छान कामगिरी होत आहे.

कर्णधार रोहित शर्मा व इशान किशन यांनी बहुतांशी वेळा दमदार सलामी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पुनरावृत्तीची अपेक्षा बाळगली जात असेल. सूर्यकुमार यादव याने पंजाबविरुद्धच्या लढतीत आपण फॉर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले आहे. कॅमेरुन ग्रीन, टीम डेव्हिड व तिलक वर्मा हे फलंदाजही फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे मुंबईचा संघ फलंदाजी विभागाबाबत ठाम आहे.

Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2023
CSK IPL 2023 : कोटींची किंमत मिळालेल्या खेळाडूंनाही वरचढ ठरला 20 लाखांचा खेळाडू, धोनीचाही जिंकलाय विश्वास

गुजरातच्या संघात एकापेक्षा एक असे गोलंदाज आहेत. मोहम्मद शमी, मोहित शर्मा यांच्यामध्ये कोणत्याही क्षणी सामना फिरवून देण्याची कुवत आहे. लखनौ सुपर जायंटस्‌ संघाविरुद्धच्या लढतीत अखेरच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज असताना मोहितने अचूक टप्प्यात गोलंदाजी करीत गुजरातला सामना जिंकून दिला. याशिवाय जयंत ठाकूर, नूर अहमद व राशीद खान यांच्या गोलंदाजीत सातत्य दिसून येत आहे. कर्णधार हार्दिक पंड्या व राहुल तेवतिया यांच्याकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.

मधल्या फळीवर लक्ष

गुजरातचा फलंदाजी विभागही मजबूत आहे. शुभमन गिल व रिद्धिमान साहा या सलामीवीरांच्या बॅटमधून धावा निघत आहेत. हार्दिक पंड्यानेही मागील लढतीत ६६ धावांची खेळी साकारली; पण त्यांना मधल्या फळीतील फलंदाजांवर लक्ष द्यावे लागणार आहे. कारण लखनौविरुद्धच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना त्यांना ६ बाद १३५ धावाच उभारता आल्या. डेव्हिड मिलर या दक्षिण आफ्रिकन फलंदाजाला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची गरज आहे. अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, विजय शंकर यांच्याकडून मधल्या फळीत मोठ्या आशा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com