IPL 2023 MI vs GT : फॉर्मात आलेले मुंबई इंडियन्स गतविजेत्या गुजरातला धक्का देणार?

आता अंतिम फेरीसाठी चढाओढ
IPL 2023 MI vs GT
IPL 2023 MI vs GTsakal

अहमदाबाद : एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपर जायंटस्‌ संघाचा पराभव केल्यानंतर आता मुंबई इंडियन्ससमोर उद्या होणाऱ्या दुसऱ्या क्वालीफायर लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. मागील दोन लढतींमध्ये विजयी ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा झंझावात रोखण्याचे काम गुजरात टायटन्सला करावे लागणार आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन संघांमधील ही लढत रंगणार आहे. घरच्या मैदानावर खेळण्याची संधी गुजरात टायटन्सकडे असली तरी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा शानदार फॉर्म कमी लेखून चालणार नाही. या लढतीत विजयी होणारा संघ २८ मे रोजी होणाऱ्या अंतिम लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचा सामना करेल.

मुंबईला यंदाच्या मोसमात चढउतारामधून जावे लागले. जसप्रीत बुमरा व जोफ्रा आर्चर या अनुभवी व दिग्गज गोलंदाजांच्या अनुपस्थितीत मुंबईला यंदाच्या मोसमात उतरावे लागले (दुखापतीपूर्वी आर्चरने पाच लढतींमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले). त्यामुळे मुंबईला संपूर्ण मोसमात गोलंदाजांची उणीव भासली.

IPL 2023 MI vs GT
Harsha Bhogle IPL 2023 : हर्षा भोगलेंनी चेन्नईच्या प्रेक्षकांचे कौतुक करत कोणावर साधला निशाणा?

एलिमिनेटर लढतीत गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली, पण आता त्यांना क्वालिफायर दोन व अंतिम फेरी (पोहचल्यास) या दोन्हीमध्ये ठसा उमटवावा लागणार आहे. पियूष चावला (२१ विकेट), जेसन बेहरनडॉर्फ (१४ विकेट), आकाश मधवाल (१३ विकेट) या तीन गोलंदाजांकडून मुंबईला पुन्हा एकदा आशा असणार आहेत. पियूष, जेसन व आकाश या त्रयींना शुभमन गिलला (७२२ धावा) रोखावे लागणार आहे.

ग्रीन ठरणार हुकमी एक्का

मुंबईच्या फ्रॅंचाईसने कॅमेरुन ग्रीनला १७.५ कोटींची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले. एकीकडे कोट्यवधींची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केलेले सॅम करन व बेन स्टोक्स अपयशी ठरले असतानाच ग्रीनने मुंबईसाठी कोटीमोलाची कामगिरी केली आहे. अन्‌ याच कारणामुळे गुजरातविरुद्धच्या लढतीत ग्रीन मुंबईसाठी एक्का ठरू शकतो. ग्रीनने आतापर्यंत झालेल्या १५ लढतींमध्ये एक शतक व दोन अर्धशतकांसह ४२२ धावांची फटकेबाजी केली आहे. एवढेच नव्हे तर त्याने सहा फलंदाजांनाही बाद केले आहे.

IPL 2023 MI vs GT
MI vs GT : 'आमच्या संघातून फक्त रशीदच...' गुजरातच्या पराभवानंतर कर्णधार पंड्या संतापला

सूर्या, इशानकडून अपेक्षा

मुंबईला फलंदाजी विभागात कर्णधार रोहित शर्मा (३२४ धावा), सूर्यकुमार यादव (५४४ धावा), इशान किशन (४५४ धावा), तिलक वर्मा (३०० धावा), नेहल वधेरा (२३७ धावा) व टीम डेव्हिड (२२९ धावा) या खेळाडूंवर अवलंबून रहावे लागणार आहे. मागील दोन लढतींत मुंबईच्या खेळाडूंकडून अव्वल दर्जाची कामगिरी झालेली आहे. त्यामुळे गुजरातच्या गोलंदाजांना मुंबईच्या फलंदाजांना रोखण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

हार्दिक पंड्याचा फॉर्म चिंतेचा

गुजरातसाठी शुभमन गिल, विजय शंकर (३०१), रिद्धीमान साहा (२९९ धावा) हे फलंदाज चमकदार कामगिरी करीत आहेत, पण कर्णधार हार्दिक पंड्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलेला नाही. मागील मोसमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डेव्हिड मिलरला या मोसमात अद्याप एकही अर्धशतक झळकावता आले नाही. दसुन शनाका व राहुल तेवतिया यांच्याकडून आणखी मोठ्या अपेक्षा आहेत. एकूणच काय तर गुजरातच्या खेळाडूंना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे.

IPL 2023 MI vs GT
IPL 2023 Prize Money: चॅम्पियन बनणाऱ्या टीमवर करोडोंचा पाऊस! पराभूत संघाच्या बक्षीस रकमेत बदल

तिसरी लढत

मुंबई-गुजरात यांच्यामध्ये यंदाच्या मोसमातील तिसरी लढत उद्या (ता. २६) होणार आहे. साखळी फेरीच्या दोन्ही लढतींत मुंबई व गुजरात यांनी प्रत्येकी एक लढत जिंकली आहे. त्यामुळे उद्याची लढत रोमहर्षक होण्याची शक्यता याप्रसंगी वर्तवण्यात येत आहे.

दुसरी क्वालिफायर लढत

  • गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स

  • स्थळ- अहमदाबाद

  • वेळ- संध्याकाळी ७.३० वाजता

  • प्रक्षेपण- स्टार स्पोर्टस्, जिओ सिनेमा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com