Will Virat Kohli miss IPL 2025 matches after finger injury? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये बुधवारी गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. गुजरातने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि बंगळुरूला गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून तिसऱ्यावर घसरावे लागले. पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स हे अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. RCB vs GT सामन्यात विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो आयपीएलमधील पुढील काही सामने मुकतोय की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. अशात प्रशिक्षक अँडी फ्लॉवर ( Andy Flower ) यांनी महत्ताचे अपडेट्स दिले.