GT vs RR Video : झेल पकडण्यांच श्रेय घेण्यासाठी धावले तिघे अन् चौथ्यानंच डाव साधला

Wriddhiman Saha GT vs RR Video
Wriddhiman Saha GT vs RR Videoesakal

Wriddhiman Saha GT vs RR Video : आयपीएलच्या सुपर संडेमधील दुसरा सामना अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्याच षटकात ट्रेट बोल्डने गुजरातचा सलामीवीर वृद्धीमान साहाची विकेट घेत गुजरातला धक्का दिला. मात्र वृद्धीमान साहाची ही विकेट दिसायला साधी होती मात्र या विकेटमागे गोलंदाज पकडून तब्बल राजस्थानचा जवळपास निम्मा संघ गुंतला होता.

Wriddhiman Saha GT vs RR Video
Nitish Rana : केकेआरच्या कर्णधाराची सोज्वळ दिसणाऱ्या ऋतिकला शिवीगाळ; VIDEO होतोय तुफान व्हायरल

त्याचं झालं असं की नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यानंतर संजू सॅमसनने पहिले षटक टाकण्याची जबाबदारी अनुभवी ट्रेंट बोल्टवर टाकली. मात्र वृद्धीमान साहाने त्याला चौकार मारत त्याचे चांगलेच स्वागत केले. परंतु बोल्टने तिसऱ्या चेंडूवर पलटवार केला. बोल्टने टाकलेला चेंडू साहाच्या बॅटची कडा घेऊन उंच आकाशात उडाला. हा चेंडू खेळपट्टीच्या आसपासच असल्याने विकेटकीपर संजू सॅमसन, हेटमयार आणि ध्रुव जुरेल देखील झेल घेण्यासाठी चेंडूच्या दिशेने सरसावले.

बोल्ट देखील आपल्याच गोलंदाजीवर झेल घेण्याच्या इराद्यात होता. मात्र संजूने झेल माझा आहे मी घेतो असा कॉल दिला. मात्र हा कॉल ना हेटमायरने ऐकला ना जुरेलने ऐकला! परिणामी यांची टक्कर झाली अन् झेल सुटला. तेवढ्याच हा सगळा सावळा गोंधळ पाहत असलेल्या ट्रेंट बोल्टने 'वक्त की नजाकत' ओळखली आणि झेल अलगद पकडला. अशा प्रकारे बोल्टला कॉट अँड बोल्डवर पहिली विकेट मिळाली.

Wriddhiman Saha GT vs RR Video
MI vs KKR : कर्णधार होताच सूर्या तळपला! इशान किशनही अर्धशतक करून चमकला

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बोल्टने वृद्धीमान साहाला पहिल्याच षटकात बाद केल्यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र 20 धावांवर साई सुदर्शन धावबाद झाला अन् गुजरातला पॉवर प्लेमध्ये दुसरा धक्का बसला.

या दोन धक्क्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने आक्रमक फटकेबाजी करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूने शुभमन गिल अँकर इनिंग खेळत होता. मात्र या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी जोडल्यावर युझवेंद्र चहलने 19 चेंडूत 28 धावा करणाऱ्या हार्दिकची शिकार केली. हार्दिक बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि शुभमन गिलने गुजरातला 16 व्या षटकात 121 धावांपर्यंत पोहचवले. मात्र संदीप शर्माने शुभमन गिलची 34 चेंडूत केलेली 45 धावांची खेळी संपवली.

गिल बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांनी गुजरातला 150 च्या पार पोहचवले. अभिनव मनोहर आक्रमक फटकेबाजी करत होता.

(Sports Latets News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com