GT vs SRH IPL 2023: हैदराबादचा खेळ खल्लास! गुजरातने हा सामना 34 धावांनी जिंकून प्लेऑफमध्ये मारली एन्ट्री

GT vs SRH IPL 2023
GT vs SRH IPL 2023

GT vs SRH Score IPL 2023 : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. या विजयासह गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. याचबरोबर हैदराबादचे 11 सामन्यांत आठ गुण आहेत. यासह एडेन मार्करामचे हैदराबाद स्पर्धेतून जवळपास बाहेर झाला आहे.

 मोहम्मद शमी अन् मोहित शर्मासमोर हैदराबाद संघाची बत्ती गुल! बसला सहावा धक्का

45 धावांच्या स्कोअरवर सनरायझर्स हैदराबादची पाचवी विकेट पडली. सनवीर सिंग सहा चेंडूत सात धावा करून बाद झाला आहे. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर साई सुदर्शनने त्याचा झेल टिपला.

त्याच षटकात 49 धावांवर अब्दुल समदच्या रूपाने हैदराबादला सहावा धक्का बसला. त्याने तीन चेंडूत चार धावा केल्या.

GT vs SRH Live Score: मोहम्मद शमीसमोर हैदराबाद संघाची बत्ती गुल! दिला चौथा धक्का

29 धावांच्या स्कोअरवर सनरायझर्स हैदराबादची चौथी विकेट पडली. संघाचा कर्णधार एडन मार्कराम 10 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला झेलबाद केले. या सामन्यातील शमीची ही तिसरी विकेट आहे. आता सनवीर सिंग हेनरिक क्लासेनसोबत क्रीजवर आहे. हैदराबादची धावसंख्या पाच षटकांनंतर 4 बाद 35 अशी आहे.

GT vs SRH Live Score: हैदराबादला 3 षटकात 3 धक्के! गुजरातच्या गोलंदाजांचा तांडव

189 धावांचा पाठलाग करताना हैदराबाद सुरुवातीलाच बॅकफूटवर आला आहे. सनरायझर्स हैदराबादची पहिली विकेट सहा धावांच्या स्कोअरवर पडली. अनमोलप्रीत सिंग चार चेंडूत पाच धावा करून बाद झाला आहे. हैदराबादची दुसरी विकेट 11 धावांवरच पडली आणि संघाने अवघ्या 2 षटकांत दोन्ही सलामीवीर गमावले. मोहम्मद शमीने अनमोलप्रीत सिंगला राशिद खानकडून झेलबाद केले. तर यश दयालने अभिषेक शर्माला आऊट करत आपले खाते उघडले.

हैदराबादला राहुल त्रिपाठीच्या रूपाने तिसरा धक्का बसला. मोहम्मद शमीने त्याला झेलबाद केले. त्रिपाठीने दोन चेंडूत एक धाव घेतली. 12 धावांवर संघाच्या तीन विकेट पडल्या आहे.

GT vs SRH Live Score: W,W,W,1,W,1 शेवटच्या षटकात भुवनेश्वरचा पंजा! गिलचे शतक... हैदराबादला दिले 189 धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने नऊ गडी गमावून 188 धावा केल्या. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 101 धावा केल्या. तेथे साई सुदर्शनने 47 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय गुजरातच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने पाच बळी घेतले. मार्को जॅनसेन, फजलहक फारुकी आणि टी नटराजन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

शेवटच्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने शेवटच्या षटकात चार विकेट घेतल्या. मात्र त्याची हॅटट्रिक हुकली. या षटकात भुवनेश्वरने गिल, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांना बाद केले तर नूर अहमद धावबाद झाला.

शुभमन गिलने ठोकले IPL कारकिर्दीतील पहिले शतक

शुभमन गिलने 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. गिलचे आयपीएलमधील हे पहिले शतक आहे. गुजरात टायटन्ससाठी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे. 19 षटकांनंतर गुजरातची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 186 अशी आहे.

GT vs SRH Live Score: गुजरातला सलग 4 धक्के... शुभमन गिल शतकाच्या जवळ... धावसंख्या 175/5

GT vs SRH Live Score: गिलची तूफानी फटकेबाजी! ठोकले शानदार अर्धशतक

शुभमन गिलने 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार मारले आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे गुजरात संघाची धावसंख्या एका विकेटवर 100 धावांच्या जवळ पोहोचली आहे. गिलचे हे पाचवे अर्धशतक आहे. आठ षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एका विकेटवर 89 अशी आहे.

पॉवरप्लेनंतर गुजरातचा स्कोर 66/1 

प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने पॉवरप्लेमध्ये एक गडी गमावून 66 धावा केल्या. गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याचवेळी साई सुदर्शनही त्याला साथ देत आहे. सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर साहा बाद झाल्यानंतर या दोघांनीही शानदार भागीदारी केली. सात षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एका विकेटवर 78 अशी आहे.

GT vs SRH Live Score: शून्यावर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! ऋद्धिमान साहा तंबूत

प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात अत्यंत खराब झाली. या सामन्यात ऋद्धिमान साहा खातेही न उघडता बाद झाला आहे. भुवनेश्वर कुमारने त्याला झेलबाद केले. साहाने तीन चेंडूंचा सामना केला मात्र त्याला खाते उघडता आले नाही. आता साई सुदर्शन शुभमन गिलसोबत क्रीझवर आहे. दोन षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एका विकेटवर 17 धावा आहे.

GT vs SRH Live Score: गुजरातविरुद्ध हैदराबादने जिंकले नाणेफेक! घेतला हा निर्णय

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार मार्करामने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com