विराट कोहलीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुदर्शनचा... ; आईचा खुलासा | Sai Sudharsan Virat Kohli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Sudharsan Mother Revealed Changed Attitude After Watching Virat Kohli Video

विराट कोहलीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुदर्शनचा...; आईचा खुलासा

Sai Sudharsan IPL 2022: टीम इंडियाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्म मध्ये जात आहे. असे असताना अनेकांसाठी विराट कोहली आजही स्टार आयकॉन आहे. विराट कोहली आयपीएलच्या या हंगामात युवा खेळाडूंशी भरपूर संवाद साधताना दिसतो. फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे युवा क्रिकेटपटू नाही, तर दुसऱ्या संघामधील खेळाडूंशी संवाद साधताना दिसतो. कोहली कडून प्रेरित झालेल्या खेळाडूंच्या यादीत आता साई सुदर्शनचे नावही सामील झाले आहे.(Sai Sudharsan Mother Revealed Changed Attitude After Watching Virat Kohli Video)

हेही वाचा: छा गए बापू! IPL इतिहासात अशी कामगिरी अक्षर पटेल चौथा गोलंदाज

गुजरात टायटन्सकडून खेळत असलेल्या बिसाई सुदर्शन आपल्या बॅटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुदर्शनने या हंगामात पाच सामन्यांमध्ये 145 धावा केल्या आहेत. यात त्याने पंजाब किंग्जविरुद्ध 65 धावांची खेळीही खेळली. सुदर्शन अनेक युवा भारतीय खेळाडूंप्रमाणे या आयपीएलमध्ये धमाल करत आहे. पण सुरवातीला सुदर्शन फिटनेसवर फारसा लक्ष देत नव्हता. याच्या खुलासा खुद्द सुदर्शनच्या आई उषा यांनी केला आहे.

हेही वाचा: कोहलीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुदर्शनचा दृष्टिकोन बदलला - आईचा खुलासा

साई सुदर्शनची आई उषाने एका मुलाखतीत सांगितले की, बर्‍याच लहान मुलांना फिटनेसची आवड नसते. साई ही त्याच्या सुरुवातीच्या काळात तसाच होता. त्यानंतर विराट कोहलीचे बरेच व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने स्वतःला दृष्टिकोन बदलला. सुदर्शन म्हणतो की विराटच्या फिटनेसच्या व्हिडिओमुळे मला खूप आत्मविश्वास मिळतो. पुढे बोलताना उषा म्हणाली, या दोन वर्षांत त्यांनी गांभीर्याने प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. करोना महामारीच्या काळात त्याने त्याच्या तंदुरुस्तीवर खूप मेहनत घेतली.

Web Title: Gujarat Titans Batsman Sai Sudharsan Mother Revealed Changed Attitude After Watching Virat Kohli Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top