GT vs MI IPL 2023 : गुजरातने मुंबईला चारली पराभवाची धूळ

GT vs MI IPL 2023
GT vs MI IPL 2023esakal

GT vs MI IPL 2023 : गुजरातने विजयासाठी ठेवलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 9 बाद 152 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईचा तब्बल 55 धावांनी पराभव झाला. गुजरातकडून नूर अहमद (3 विकेट) आणि राशिद खान (2 विकेट) यांनी भेदक मारा केला. मुंबईकडून नेहल वधेराने सर्वाधिक 40 धावा केल्या. विशेष म्हणजे गुजरातने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच मुंबईला पराभवाची धूळ चारली.

मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्ज विरूद्ध जी चूक केली होती. तीच चूक गुजरात टायटन्स विरूद्ध देखील केली. गोलंदाजी करताना पहिल्या 15 षटकात धावांवर अंकुश ठेवला. मात्र शेवटच्या 5 षटकात धावांची लयलूट केली. आजच्या सामन्यात देखील मुंबईच्या गोलंदाजांनी शेवटच्या 5 षटकात 77 धावा दिल्या. यामुळे पुन्हा एकदा रोहित सेनेला 207 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे.

गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर अभिनव मनोहरने 21 चेंडूत 42 धावा, राहुल तेवतियाने 5 चेंडूत 20 तर डेव्हिड मिलरने 22 चेंडूत 46 धावा ठोकल्या. मुंबईकडून पियुष चावलाने 34 धावात 2 बळी टिलले.

101-4 : गिलचे अर्धशतक, चावलानेही दिले धक्के

पॉवर प्लेच्या पहिल्या 5 षटकात संथ सुरूवात करणाऱ्या गुजरातने शेवटच्या षटकात धडाकेबाज फलंदाजी केली. शुभमन गिलने कॅमरून ग्रीनच्या गोलंदाजीवर 17 धावा चोपत संघाचे अर्धशतक पूर्ण करून दिले.

यानंतर मात्र चावलाने पांड्याला 13 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान, आक्रमक अवतारात असलेल्या शुभमन गिलने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र कुमार कार्तिकेयने गिलची अर्धशतकी खेळी 53 धावांवर संपवली. पाठोपाठ विजय शंकर देखील 19 धावा करून बाद झाला. मात्र तो बाद होण्यापूर्वी गुजरातने आपले शतक पूर्ण केले होते.

GT 33/1 (5) : अर्जुन तेंडुकरने गुजरातला दिला पहिला धक्का

अर्जुन तेंडुलकरने नवीन चेंडूवर पुन्हा एकदा कमाल केली. त्याने गुजरातचा सलामीवीर वृद्धीमान साहाला 4 धावांवर बाद केले. यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न करत गुजरातला 5 षटकात 33 धावांपर्यंत पोहचवले.

मुंबईच्या संघात दोन बदल 

पंजाबविरूद्ध बद्या मार खालेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या गोलंदाजी विभागात दोन बदल केले आहेत. ऋतिक शौकीन आजचा सामना खेळत नाहीये. त्याच्या ऐवजी कुमार कार्तिकेयला संधी मिळाली आहे. तर जोफ्रा आर्चरला बर वाटत नसल्यामुळे रिले मेरेडिथला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

मुंबईने नाणेफेक जिंकली

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com