IPL 2022 Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore
IPL 2022 Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore ESAKAL

GT vs RCB : विराट फॉर्ममध्ये मात्र आरसीबी अजून पराभवाच्या गर्तेतच

RCB समोर गुजरातचा विजयी रथ रोखण्याचे आव्हान

डेव्हिड मिलर - राहुल तेवतियाने फटकेबाजी करत जिंकून दिला सामना Highlights  

गुजरातने 95 धावांवर 4 फलंदाज बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतियाने आक्रमक फलंदाजी करत सामना जिंकून दिला. मिलरने 24 चेंडूत 39 तर राहुल तेवतियाने 25 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली.

95-4 : आरसीबीच्या फिरकीत गुजरात अडकला

शाहबाजने दोन विकेट घेतल्यानंतर हसरंगाने देखील साई सुदर्शनला 20 धावांवर बाद करत चौथा धक्का दिला.

78-3 : शाहबाज अहमदने हार्दिकची केली शिकार

शाहबाजने सेट झालेल्या शुभमन गिलला बाद केल्यानंतर हार्दिक पांड्याला देखील अवघ्या 3 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

68-2 : गुजरातचा दुसरा सलामीवीर देखील माघारी

शाहबाज अहमदने गुजरात टायटन्सचा दुसरा सलामीवीर शुभमन गिलला 31 धावांवर बाद केले.

51-1 : गुजरातला पहिला धक्का

गुजरात टायटन्सला हसगंगाने पहिला धक्का दिला. त्याने वृद्धीमान साहाला 29 धावांवर बाद केले.

6/ 46-0 : गुजरातची दमदार सुरूवात 

आरसीबीने ठेवलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना गुजरातचे सलामीवीर शुभमन गिल आणि वृद्धीमान साहाने पॉवर प्लेमध्ये बिनबाद 46 धावा केल्या.

170-6 लोमरोरच्या फटकेबाजीमुळे आरसीबीच्या 170 धावा 

150-5 : मॅक्सवेल मोक्याच्या क्षणी बाद 

आरसीबीचे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात असताना मॅक्सवेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र लॉकी फर्ग्युसनने 18 चेंडूत 33 धावा करणाऱ्या मॅक्सवेलला बाद केले.

138-4 : दिनेश कार्तिककडून निराशा

विराट कोहली बाद झाल्यानंतर आलेला दिनेश कार्तिक देखील स्वस्तात बाद झाला. त्याला राशिद खानने 2 धावांवर बाद केले.

129-3 : अर्धशतकानंतर विराट बाद 

पाटीदार बाद झाल्यानंतर विराट कोहली देखील 53 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. मोहम्मद शामीने त्याचा त्रिफळा उडवला.

110-2 : प्रदीप सांगवानने भागीदारी तोडली

विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली 99 धावांची भागादीरी सांगवानने तोडली. त्याने रजत पाटीदारला 52 धावांवर बाद केले.

विराट - पाटीदारची भागीदारी

गेल्या काही सामन्यात बॅडपॅचमध्ये असलेला विराट कोहली गुजरात टायटन्स विरूद्ध फॉर्ममध्ये आला. त्याने रजत पाटीदार बरोबर दुसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी करत संघाला शतकाच्या जवळ पोहचवले.

  • 11/1 - RCB ला पहिला धक्का, कर्णधार डु प्लेसिस 0 वर तंबूत

    वेगवान गोलंदाज प्रदीप संगवानने हंगामातील आपला पहिला सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला केले झेलबाद. डुप्लेसिस खातेही उघडता आले नाही.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : शुभमन गिल, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद शमी.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेइंग इलेव्हन : फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवुड.

आयपीएल ४३व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातचा संघ त्यांच्या आठ सामन्यांत सात विजय नंतर 14 गुणांसह (+0.371) गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे आरसीबीचा संघ त्यांच्या नऊ सामन्यांतून चार पराभव आणि पाच विजयांसह 10 गुण (-0.572) गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com