Rajasthan Royals : आयपीएलचा 'कप' गेला पण दोन 'कॅप' आल्या

पहिला हंगाम खेळणाऱ्या गुजरातने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले
Gujarat Titans win IPL title Rajasthan
Gujarat Titans win IPL title Rajasthan

कर्णधार हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी आणि शुभमन गिलच्या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. पहिला हंगाम खेळणाऱ्या गुजरातने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे. 2008 मध्ये पहिल्यांदाच राजस्थानने ट्रॉफी जिंकून ही कामगिरी केली होती. राजस्थान रॉयल्सला आयपीएलचा कप जिंकता आला नाही. पण दोन कॅप आल्या.(Gujarat Titans win IPL title Rajasthan Royals orange cap and purple cap ipl 2022)

सामन्यात राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर जोस बटलरने एक मोठा विक्रम केला आहे. आयपीएल फायनलमध्ये बटलरने दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा एका हंगामात ८४८ धावांचा विक्रम मोडीत काढला. बटलर आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात जोस बटलरने 39 धावा केल्या. यासह त्याने आयपीएलच्या 15 व्या हंगामात 863 धावा केल्या आहेत. या कामगिरीसह तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला असून 2022 ची ऑरेंज कॅप त्याच्या नावावर आहे. संपूर्ण स्पर्धेत त्याने चार शतके आणि चार अर्धशतके केली आहेत.

युझवेंद्र चहलने आपला हंगामातील 27 बळी टिपला. याचबरोबर तो पर्पल कॅपच्या रेसमध्ये वानिंदू हसरंगाला पिछाडीवर अव्वल स्थान पटकावले आहे. युझवेंद्र चहलने फक्त पर्पल कॅप आपल्याच डोक्यावर येईल अशी कामगिरी केली नाही तर त्याने एक इतिहास देखील रचला. त्याने एखाद्या स्पिनरने एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम इम्रान ताहिरच्या नावावर होता. त्याने 2019 च्या हंगामात 26 विकेट घेतल्या होत्या. आता युझवेंद्र चहलने एका हंगामात 27 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com