तिच्यासोबत गप्पा मारताना रोहितनं दिला कटू आठवणीला उजाळा

Rohit Sharma And Jemimah Rodrigues
Rohit Sharma And Jemimah RodriguesSakal

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्याच्या घडीला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात टीम इंडियाचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे दिमाखदार नेतृत्व करुन फ्रँचायझी संघाला त्याने विक्रमी पाच ट्रॉफ्या जिंकून दिल्या आहेत. 2007 मध्ये टीम इंडियात (Team India) पदार्पण केलेल्या रोहित शर्माचा इथवरचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता. त्याने आपल्या करियरमध्ये चढ उताराचा सामना केला आहे. रोहित शर्माने नुकतेच भारतीय महिला संघाची बॅटर जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिच्यासोबतच्या खास शोच्या माध्यमातून गप्पा गोष्टी केल्या. यावेळी त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील कटू आठवणीला उजाळा दिला.

Rohit Sharma And Jemimah Rodrigues
VIDEO : मंयाकच्या अंगात शिरला विराट; भर मैदानात 'शिवराळ' भाषा

भारतीय टीम (Indian Cricket Team) आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) 2011 च्या वर्ल्ड कप स्पर्धेवेळी संघात स्थान न मिळाल्याने हताश झाला होता. काय चुकलं त्यामुळे संघात जागा मिळाली नाही, असा विचार त्याच्या मनात त्यावेळी घोळत होता. दशकभरानंतर रोहित शर्माने आपल्या मनातील त्यावेळीच्या भावना व्यक्त केलीये. भारतीय संघाने 2 एप्रिल 2011 मध्ये दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात श्रीलंका संघाला पराभूत करत टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. दिग्गजांनी बहरलेल्या टीम इंडियात रोहितला स्थान मिळाले नव्हते. 2013 मध्ये रोहित शर्माची कारकिर्द ट्रॅकवर आली. आज तो टीम इंडियाचा कॅप्टनही झालाय.

Rohit Sharma And Jemimah Rodrigues
CSK vs PBKS: सीएसकेच्या पदरी पराभवाची हॅट्ट्रिक; लिव्हिंगस्टोन ठरला किंग

टीममध्ये निवड न झाल्याने बसला होता मोठा धक्का

2011 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतल्या कटू आठवणीला उजाळा देताना रोहित शर्मा म्हणाला की, वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याच स्वप्न प्रत्येक क्रिकेटर पाहत असतो. खेळाडू संघाच्या विजयात योगदान देण्यासाठी उत्सुक असतो. मला अजूनही आठवतय, 2011 च्या वर्ल्ड कपसाठी ज्यावेळी टीम इंडियाची घोषणा झाली त्यावेळी आम्ही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होतो. संघात निवड न झाल्याने हताश झालो त्यावेळी मनातील गोष्ट व्यक्त करण्यासाठी माझ्या जवळ कोणीही नव्हत. मी माझ्या रुममध्ये एकटा पडलो होतो. काय चूक झाली? कोणत्या गोष्टी अधिक चांगल्या कराव्या लागतील. याची उत्तर शोधत होतो. 23- 24 च्या घरात असल्यामुळे खूप वेळ असल्याची समजूत घालत पुन्हा जोमाने मैदानात उतरण्याचा विचार केला. जी गोष्ट झालीये ती बदलणार नाही. पण पुढे चांगल्या गोष्टी कशा घडतील यावर फोकस केला, असेही त्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com