IPL: ...म्हणून पायावर कुऱ्हाड मारुन घेतली; पराभवानंतर पांड्याचं धक्कादायक विधान | Hardik Pandya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hardik pandya after loss against punjab kings pbks vs gt ipl 2022

IPL: ...म्हणून पायावर कुऱ्हाड मारुन घेतली; पराभवानंतर पांड्याचं धक्कादायक विधान

Hardik Pandya IPL 2022 : आयपीएल 2022 मध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सचा विजयरथ अखेर पंजाब किंग्जने संपुष्टात आणला आहे. पंजाबविरुद्ध गुजरातला 8 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. गुजरात टायटन्स कर्णधार हार्दिक पांड्याने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पांड्याच्या निर्णयावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंजाब किंग्ज प्रथम गोलदांजी करण्यासाठी मैदानात उतरला आणि गुजरातला अवघ्या 143 धावांवर रोखल. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी 4 षटके शिल्लक असताना 145 धावा करत सामना संपवला. पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की नाणेफेक जिंकून प्रथम गोलदांजी करण्याचा प्रयोग का केला?( Hardik Pandya IPL Update)

हेही वाचा: सुनील गावसकराचं मुख्यमंत्र्यांसह जितेंद्र आव्हाडांना पत्र; घेतला मोठा निर्णय...

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी का निवडली यावर बोलतांना हार्दिकने सांगितले, कठीण परिस्थितीत संघाची परीक्षा घेण्यासाठी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर 170 धावांची धावसंख्या लढण्यास योग्य ठरली असती, परंतु सतत विकेट गमावल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुजरातचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात 143 धावाच करू शकला. पंजाबने १६ षटकांत दोन गडी गमावून विजयाची नोंद केली. पंजाबकडून शिखर धवनने नाबाद 62, भानुका राजपक्षेने 40 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद 30 धावा केल्या.

Web Title: Hardik Pandya After Loss Against Punjab Kings Pbks Vs Gt Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top