सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी शेवटच्या षटकांत चोपलेल्या धावांनंतर मिशेल सँटनर आणि जसप्रीत बुमराह यांच्या प्रत्येकी तीन विकेट्सच्या मदतीने मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले. आयपीएल २०२५ च्या कालच्या सामन्यात त्यांनी फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव केला. DC ने हंगामातील त्यांचे पहिले चार सामने जिंकल्यानंतर, त्यांनी पुढील नऊ सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकले. तेच मुंबईने दमदार पुनरागमन केले.