Hardik Pandya IPL 2024 : वानखेडेवर चुकीला माफी नाही... हार्दिक पांड्याला एमसीएने देखील दिला धक्का

Hardik Pandya
Hardik Pandya esakal

Hardik Pandya MI vs RR IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये पाचवेळा चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या मुंबईची सुरूवात खराब झाली आहे. त्यांनी आपले पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सने पराभव केला. यावेळी कर्णधार पांड्याविरूद्ध जोरदार हुटिंग झालं होतं. त्यानंतर हैदराबादच्या स्टेडियमवर पांड्याच्या नेतृत्वात मुंबईच्या गोलंदाजांनी 277 धावा खाल्या. ही आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यावेळी देखील हार्दिक पांड्याविरूद्ध जोरदार हुटिंग झालं होतं.

Hardik Pandya
Mohit Sharma IPL 2024 : मोहित शर्मा 35 व्या वर्षी ठोठावतोय टीम इंडियाचं दार... अजित आगरकर देणार प्रतिसाद?

आता मुंबई होम ग्राऊंड वानखेडेवर खेळणार आहे. त्यावेळी तर पांड्याविरूद्ध हुटिंगचा कहर होणार असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने पांड्याविरूद्ध हुटिंग करणाऱ्या चाहत्यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे वृत्त आलं. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनने अशा कोणत्याही कारवाईची शक्यता फेटाळून लावली. त्यामुळे पांड्याविरूद्ध वानखेडेवर देखील जोरदार हुटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) सामन्यादरम्यान हुटिंग करणाऱ्या चाहत्यांविरूद्ध कडक कारवाई करणार असल्याचे वृत्त आले होते. हार्दिक पांड्याविरूद्ध हुटिंग करणाऱ्यांना स्टेडियमच्या बाहेर पाठवलं जाईल असं या वृत्तात म्हटलं होतं.

मात्र असोसिएशनच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हुटिंग रोखण्याबद्दलच्या बातम्या खोट्या आहेत. स्टेडियमवरील आगामी सामन्याबाबत विशेष अशी सुचना देण्यात आलेली नाही. एमसीए स्टेडियमवरील चाहत्यांच्या वर्तनाबाबत बीसीसीआयच्या मार्गदर्शन तत्वांचेच पालन करणार आहे.

Hardik Pandya
IPL 2024 DC vs CSK Live Score : आक्रमक वॉर्नरचे अर्धशतक, पृथ्वी शॉची देखील समर्थ साथ

हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समधून ट्रेड करून मुंबई इंडियन्सचा थेट कर्णधार केल्याने चाहते प्रचंड नाराज आहेत. मुंबईला 5 वेळा विजेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला असं कॅप्टन्सीवरून काढून टाकण्याचा चाहत्यांना राग आला असून ते मैदानावर आपला राग पांड्यावर काढत आहेत.

त्यात आता वानखेडेवर पांड्यासाठी कोणतीही अतिरिक्त सुरक्षा असणार नाही. त्यामुळे जे अहमदाबादमध्ये आणि हैदराबादमध्ये झाले ते वानखेडेवर होण्याची देखील दाट शक्यता आहे. सामन्यादरम्यान, रोहित शर्माच्या नावाचा जयघोष अन् पांड्याविरूद्ध हुटिंग होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती सामना खेळणे पांड्यासाठी आव्हानात्मक असणार आहे.

(IPL Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com